बडनेरा येथे भारतीय जनसंचार संस्था ( I.I.M.C ) केंद्र सुरु करण्याकरीता मान्यता

बडनेरा येथे भारतीय जनसंचार संस्था ( I.I.M.C ) केंद्र सुरु करण्याकरीता खासदार सौ.नवनित रवि राणा यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश -गृहमंत्री अमितजी शाह व केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाशजी जावडेकर यांनी दिली मान्यता-

 बडनेरा येथे सुरु होणार भारतीय जनसंचार संस्था ( I.I.M.C ) केंद्र - देशात फक्त ०६ ठिकाणी हे केंद्र सुरु आहे यामध्ये बडनेरा शहराचा समावेश.

 केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये बिल्डीग , संशोधन केंद्र , विद्यार्थ्यासाठी वस्तीगृह बांधकामाकरीता निधी मंजुर. अमरावती - दिनांक २०-०३-२०२१. देशाच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये खासदार सौ.नवनित रवि राणा यांनी भारतीय जनसंचार संस्था ( I.I.M.C ) केंद्र बडनेरा येथे सुरु करण्यासाठी व बिल्डीग करीता निधीचे प्रावधान करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री अमितजी शाह व केंद्रीय सुचना प्रसारण मंत्री प्रकाशजी जावडेकर यांना प्रत्यक्ष भेटुन पाठपुरावा केला असता केंद्रीय सुचना प्रसारण मंत्री प्रकाशजी जावडेकर यांनी अमरावती बडनेरा येथील भारतीय जनसंचार संस्था ( I.I.M.C ) केंद्र सुरु करण्याचे आदेश काढले आहे . त्यांनी त्यांच्या कार्यालयाचे आदेश क्र.एम .१६०१६ / १/२०२१ आई.पी.एंड एम.सी दि .१० / ०३ / २०२१ चे रोजीच्या आदेशान्वये केंद्र सुरु करण्यासाठी आदेशित केलेले आहे . त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या केद्रीय प्रसारण मंत्रालय यांनी श्री.संजय दिवेदी , महासंचालक , इंडीयन इन्स्टपुट ऑफ मास्क कॉम्युन्युकेशन आय.आय.एम.सी यांना पत्राव्दारे मान्यता देवून लवकरच या संबधाने कार्यवाही करण्यासाठी आदेश दिलेले आहेत . 


भारत देशात भारतीय जनसंचार संस्था ( I.I.M.C ) केंद्र फक्त ०६ ठिकाणी आहे . त्यापैकी बडनेरा अमरावती जिल्हयाला हे केंद्र सुरु करण्याचा बहुमान खासदार सौ.नवनित रवि राणा यांना मिळालेला आहे . पत्रकार व मास्क कॉम्युन्युकेशन उच्चस्तरीय अभ्यास करण्याकरीता या केंद्राचा निश्चित विदर्भातील ,अमरावती जिल्ह्यातील  लाभ अनेकांना होणार आहे महाराष्ट्र राज्यात या क्षेत्रात काम करणारी संथा हे पहिलेच केंद्र आहे मास्क कॉमुनिकेशन, हायटेक पत्रकारिता तंत्रज्ञान अभ्यासक्रम या संस्थेच्या केंद्राचे माध्यमातून मिळणार देशपातळीवरील पत्रकार या केंद्रातून तयार होतील विदर्भातील, अमरावती जिल्ह्यातील विद्याथ्र्यांना याचा लाभ होईल.

अमरावती. यामध्ये एजवाल ( मिझोरम ) , देहनकनाल ( उडीसा ) , जम्मु ( जम्मु कश्मीर ) और कोटायम ( केरला ) हे चार केंद्र सुरु झालेले आहे . यामध्ये आता अमरावतीचा समावेश होणार आहे . अनेक वर्षापासुन या विषयाकडे लक्ष न दिल्याने हे केंद्र निर्माण झाले नव्हते . विद्यार्थ्याकरीता निवासस्थान , आवास , संशोधन केंद्र व बिल्डीग हे कार्य करण्याकरीता खासदार सौ.नवनित रवि राणा यांच्या मागणीप्रमाणे केंद्राने निधी मंजुर केला असून लवकरच या कार्याला सुरवात होणार आहे . खासदार सी.नवनित रवि राणा यांच्या पाठराव्याने पुन्हा एकदा अमरावती जिल्हयाला भारतीय जनसंचार संस्था ( I.L.M.C ) केंद्र मिळाल्याने अमरावती जिल्हयाचे नाव देशपातळीवर उंचावलेले आहे हे अभिमानाची बाब आहे . या क्षेत्रामध्ये काम करणारे उच्च वर्गानी खासदार सौ.नवनित रवि राणा यांच्या कामाप्रती आनंद व्यक्त केला आहे .

Previous Post Next Post
MahaClickNews