महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी, लाचखोर महाआघाडी सरकार चे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, भाजपा ची मागणी

महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी, लाचखोर महाआघाडी सरकार चे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, भाजपा ची मागणी

अमरावती : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून सचिन वाझे यांना दरमहिना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे 'टार्गेट' दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एक वादळ उठले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अशा खंडणीखोर मंत्र्याने राहू नये अशी मागणी करत विरोधीपक्ष असलेल्या भाजपतर्फे निदर्शने करण्यात येत आहेत. 

अमरावती शहरातही शहर जिल्हा भाजपतर्फे राजकमल चौकात आघाडी सरकार व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. खंडणीखोर अनिल देशमुखांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी भाजपतर्फे करण्यात आली. तसेच महाविकास आघाडी सरकार,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नारेबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, शहर अध्यक्ष किरण पातूरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, महापौर चेतन गावंडे यांच्यासह भाजपचे नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews