मोर्शी - ब्राम्हणवाडा थडी - परतवाडा या मार्गावर प्रहार चे चक्काजाम आंदोलन

चादुरबाजार :प्रतिनिधी 
केंद्र सरकारच्या शेतकरी कृषी कायद्याविरोधात , तसेच शेतकर्यांच्या पिक मालाला  योग्य हमीभाव मिळावा याकरिता *प्रहार शेतकरी संघटना अमरावती जिल्हाध्यक्ष  मंगेशभाऊ देशमुख* यांच्या नेतृत्वात मोर्शी - ब्राम्हणवाडा थडी - परतवाडा  या मार्गावर चक्काजाम आंदोलन करुन या भारत बंद ला व दिल्ली येथील शेतकर्यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने समर्थन देण्यात आले यावेळी या आंदोलनात कुरणखेड गावचे प्रहार चे युवा सरपंच  मोहीतभाऊ देशमुख, वणी बेलखेडा ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच व सदस्य तसेच प्रहार कार्यकर्ते व सर्व शेतकरी सहभागी झाले होते.
Previous Post Next Post
MahaClickNews