अमरावती, दि. 22 : दिव्यांग बांधवांना बनावट प्रमाणपत्र देऊन त्यांची फसवणूक करणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय आहे. दिव्यांग बांधवांनी अशा दलालांपासून सावध राहावे व त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी केले आहे.
चार दिव्यांग बांधवांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याबाबत तिवसा पोलीस ठाण्याकडून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला पत्र प्राप्त झाले होते. ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यावरील सही व शिक्केही बनावट होते. त्यामुळे अशी टोळी जिल्ह्यात सक्रिय असून, दिव्यांग बांधवांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन डॉ. निकम यांनी केले आहे.
*अडचण आली तर संपर्क साधा*