फार्मासिस्ट - केमिस्ट बांधवांचे लवकरच होणार कोविड लसीकरण

फार्मासिस्ट - केमिस्ट बांधवांचे लवकरच होणार कोविड लसीकरण
आ. सुलभा खोडके यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे व 
अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा

अमरावती जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएअशनच्या निवेदनाची सुलभाताईंकडून कडून तत्काळ दखल            अमरावती :   गेल्या वर्षभरापासूनच्या कोरोना  महामारी काळात सर्वत्र लॉकडाऊन असतांनाही अत्यावश्यक सेवा म्हणून औषधांची विक्री व वितरण करणाऱ्या फार्मासिस्ट-केमिस्ट बांधव तसेच औषधी वितरकांचे कोविड-19 लसीकरणाला घेऊन लवकरच मोहीम सुरू होणार आहे. यासंदर्भात अमरावतीचे आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेशजी टोपे व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.राजेंद्रजी शिंगणे  यांना पत्र देऊन सकारात्मक चर्चा केली.       

                                 
सध्या कोरोना महामारीचा काळ बघता राज्य शासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मालिकाच राबवली जात आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर, फ्रन्टलाइन वर्कर यांचे लसीकरण केल्या नंतर आता ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड-19 लसीकरण आला सुद्धा सुरुवात झाली आहे. हेल्थ केअर वर्कर जसे की डॉक्टर ,नर्स ,आरोग्य सेवक, सफाई कामगार यांचे लसीकरण करण्यात आले , मात्र वैद्यकीय सेवेमध्ये औषध वितरकांची महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या फार्मासिस्ट -केमिस्ट, औषध वितरकांचे अजून पर्यंत राज्यात कुठेही कोविड-19 संदर्भात लसीकरण करण्यात आले  नाही. यासंदर्भात अमरावती जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आ.सौ. सुलभाताई खोडके यांना निवेदन देण्यात आले. कुठलाही रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्याला औषधांचा उपचार सुचवला असता तो थेट औषधी सेवा देणाऱ्या फार्मासिस्ट कडे येतो, त्यामुळे मागील वर्षभरापासून फार्मासिस्ट- केमिस्ट हे सातत्याने रुग्णांच्या संपर्कात आहेत. 

मात्र त्यांच्या सुरक्षेला घेऊन अजून पर्यंत कुठलीही ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याची कैफियत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार महोदयांनी समक्ष व्यक्त केली .यावर आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी फार्मासिस्ट बांधवांना कोरोना योद्धा संबोधून त्यांच्या कार्याचे व धाडसाचे कौतुक केले. तसेच  आपण लवकरात लवकर फार्मासिस्ट, केमिस्ट व औषध वितरक यांच्यासाठी कोविड-19 लसीकरण सुरु होण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास दर्शविला. तसेच सदर बाब गंभीरतेने घेऊन आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. राजेश टोपे व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. राजेंद्रजी शिंगणे यांना पत्र देऊन फार्मासिस्ट- केमिस्ट यांच्यासाठी कोविड-19 लसीकरण मोहीम राबविण्याची विनंती केली. कोरोना महामारी व लॉकडाउन काळात औषधी सेवा अविरत सुरू असून डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक ,सफाई कामगार यांच्या प्रमाणे फार्मासिस्ट बंधू देखील एखाद्या योद्धाप्रमाणे जीवाची पर्वा न करता औषधी सेवा चोखपणे बजावत  आहे. दरम्यान काही फार्मासिस्ट-केमिस्ट बंधूंना आपले प्राण देखील गमवावे लागले असल्याबाबत आ. सुलभाताई खोडके यांनी दोन्ही मंत्रीमहोदयांना पत्राद्वारे अवगत केले .तसेच दूरध्वनीवरून संवाद साधला असता अमरावती जिल्ह्यासह राज्यात लवकरच फार्मासिस्ट- केमिस्ट यांच्यासाठी कोविड-19 लसीकरण मोहीम राबवणार असल्याची माहिती नामदार राजेंद्र शिंगणे व नामदार राजेशजी  टोपे यांच्या वतीने आ. सुलभाताई खोडके यांना देण्यात आली. यावर फार्मासिस्ट बांधवांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र स्थापन करावे, पुरेसा लसीचा साठा उपलब्ध करावा, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाय-योजना कराव्यात अशी सूचना आमदार महोदयांद्वारे करण्यात आली. त्यामुळे आता लवकरच फर्माशीष्ट-केमिस्ट व औषधी वितरकांसाठी कोविड-19 लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे.

Previous Post Next Post
MahaClickNews