प्रशासन नमले ; उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्यनांदगांववासीयांच्या पांदण रस्त्याचा मार्ग मोकळाग्रामविकास अधिकारी यांनी दिले लेखी आश्वासन

प्रशासन नमले ; उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्यनांदगांववासीयांच्या पांदण रस्त्याचा मार्ग मोकळाग्रामविकास अधिकारी यांनी दिले लेखी आश्वासन

नांदगावपेठ प्रतिनिधी : 

 शुक्रवारपासून गजानन कॉलनी येथील नागरिकांनी पांदण रस्त्यासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणापुढे अखेर प्रशासन नमले ग्रामविकास अधिकारी जयश्री गजभिये यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर शनिवारी संध्याकाळी उपोषण मागे घेण्यात आले.जिल्हा परिषद सदस्य भारती गेडाम,ग्रामविकास अधिकारी जयश्री गजभिये, मंडळ अधिकारी विशाल धोटे व तलाठी रुपेश पाठक यांच्या पुढाकाराने उपोषणकर्त्यांना निंबुपाणी देऊन उपोषण सोडविण्यात आले.

     नांदगांव पेठ खानापूर पांदण रस्त्याच्या मागणीसाठी शुक्रवारपासून पत्रकार मंगेश तायडे, भारतसिंग बैस, विजय राऊत,मयूर काकडे, गौरव वीर यांचेसह गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. पांदण रस्त्याची मोजणी करून मार्ग मोकळा करावा तोपर्यंत पांदण रस्त्यावर सुरू असलेल्या बांधकामावर स्थगिती आणण्यात यावी याकरिता सर्व गावकरी एकवटले होते. शुक्रवारी प्रशासनाने संबंधितांना नोटीस जारी केला होत्या मात्र शनिवारी दुपारपर्यंत कोणतेही लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना देण्यात आले नव्हते दरम्यान दुपारी दोन उपोषण कर्त्यांची प्रकृती देखील खालावली होती व त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने प्रकरण हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस विभागाने गतीने चक्र फिरविले व सहा वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषद सदस्य भारती गेडाम,ग्रामविकास अधिकारी जयश्री गजभिये, मंडळ अधिकारी विशाल धोटे व तलाठी रुपेश पाठक यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांना लेखी पत्र दिले व उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

      ग्रामपंचायतने संबंधितांना नोटीस बजावली असून तहसीलदार जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत रस्त्यावरील बंधकामावर स्थगिती देण्यात आली आहे, सदर रस्त्याची शासकीय मोजणी करून पांदण रस्ता काढून देण्यात येईल तसेच त्यावर झालेले अतिक्रमण देखील काढण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.
यावेळी राजू चिरडे, तिरमदास कापडे, सुरज बैस, शशी मुळे, पंकज देशमुख, शशी पिसे,चंदू पिसे, रत्नाकर राजूरकर, उमेश तायडे, राजन देशमुख, प्रल्हाद पटके, कुमोद पांडे, विनोद इंगळे, माणिक काकडे, राहुल उके, सिंधू डोईफोडे, सतीश वाघमारे, मधुकर देशमुख, मनोज डोईफोडे, गजानन सुंदरकर, प्रफुल्ल तायडे,प्रभाकर शेंडे, निलेश सरोदे, शशी बैस यांचेसह परिसरातील असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews