शहीद भगतसिंग बालोद्यानाची महापौर चेतन गावंडे यांनी केली पाहणी

अमरावती प्रतिनिधी, 
महापौर चेतन गावंडे यांनी आज दिनांक २३ मार्च,२०२१ रोजी टोपे नगर परिसराची पाहणी केली. पाहणी दरम्‍यान गटनेता दिनेश बुब, नगरसेवक श्रीचंद तेजवानी, बलदेव बजाज, शहर अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक आयुक्‍त नरेंद्र वानखडे, कार्यकारी अभियंता २ सुहास चव्‍हाण, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, उद्यान अधिक्षक मुकुंद राऊत, अभियंता दिनेश हंबर्डे उपस्थित होते. यावेळी टोपे नगर परिसराबाबत संबंधीतांशी सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली. 
शहीद भगतसिंग यांचे बंधू सरदार कुलबीरसिंग यांच्‍या हस्‍ते शहीद भगतसिंग बालोद्यानाचा शिलान्‍यास करण्‍यात आला. याला आता ४८ वर्षे पूर्ण होत आहेत. येथे आता फुटबॉल खेळाचे मैदान आहे व त्‍याचीही दुरवस्‍था झालेली आहे. 
ऐतिहासिक बालोद्यानाच्‍या जागेवर आता फुटबॉलचे मैदान आहे. सायंकाळी मुल मुली येथे खेळतात. कुंपणभिंत, सकाळी फिरण्‍यासाठी ट्रॅक तयार करण्‍यात आला आहे. या ठिकाणी सेंट्रींगचे सामान, लाकडे पडलेली आढळून आली. 
शहीद भगतसिंग यांच्‍या स्‍मृतिदिनी या बालोद्यानाची पाहणी करण्‍यात आली व बजेटच्‍या सभेनंतर येणा-या आमसभेत यासाठीची तरतूद करण्‍यात येईल असे महापौर चेतन गावंडे यांनी सांगितले.  
यावेळी सदर परिसरातील स्‍थानिक नागरीक यांच्‍याशी चर्चा करण्‍यात आली व या परिसरातील नागरीकांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. या समस्‍या त्‍वरीत सोडविण्‍याचे निर्देश यावेळी संबंधितांना दिले. पाहणी दरम्‍यान नागरीकांशी चर्चा करुन संबंधीत अधिका-यांना सुचना दिल्‍या ज्‍या ज्‍या ठिकाणी नागरीकांना अडचणी आहेत त्‍या त्‍वरीत सोडविण्‍या संदर्भात निर्देश देण्‍यात आले. या उद्यानाची संपुर्ण साफसफाई कर.ण्‍याच सुचना व उद्यानातील अतिक्रमण त्‍वरीत हटविण्‍यासाठी निर्देश यावेळी महापौरांनी दिले.
Previous Post Next Post
MahaClickNews