प्रधानमंत्री आवास योजना घटक क्र.३ अंतर्गत सदनिका विकत घेणा-या लाभार्थ्‍याकरीता मार्गदर्शक सुचना

अमरावती प्रतिनिधी,

घटक क्र.३ अंतर्गत लाभार्थी कुटूंबाचे भारतात पक्‍के घर नसावे व त्‍याचे सामायिक वार्षिक उत्‍पन्‍न रु.३ लक्ष असावे. या दोन्‍ही अटी पुर्ण करणा-या लाभार्थ्‍यांची निवड निश्चित करण्‍यात येते.

केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर ८६० सदनिका बांधकामाकरीता अमरावती महानगरपालिका हद्दीतील प्रस्तावित भूखंड मौजा म्‍हसला स.नं.२१/फ सदनिका ६० अंदाजे किंमत ९.४८ रुपये लक्ष मध्‍ये सदनिका बांधकामाचे स्‍थळ तपोवन परिसर, कृष्‍णानगर, मौजा म्‍हसला स.नं.२२ सदनिका ९६ अंदाजे किंमत ९.६१ रुपये लक्ष मध्‍ये सदनिका बांधकामाचे स्‍थळ तपोवन परिसर, गोविंद नगर योगीराज नगर चे बाजूला, निंभोरा स.नं.५५/२ भाग सदनिका ४४ अंदाजे किंमत ११.४० रुपये लक्ष मध्‍ये सदनिका बांधकामाचे स्‍थळ अमरावती बडनेरा रोड, हुंदाई शो रुमचे विरुध्‍द बाजुस, बडनेरा रोड पासून १०० मी. आत (मोहिनी हॉटेल व ढोले हॉस्पिटलचे मधला भाग), बडनेरा स.नं.१०/३ सदनिका ४४ अंदाजे किंमत ९.०० रुपये लक्ष सदनिका बांधकामाचे स्‍थळ अमरावती बडनेरा रोड, साहील लॉनचे विरुध्‍द बाजुस, बडनेरा रोडपासून ३०० मी आत (विठ्ठलवाडी), बडनेरा स.नं.१९४ सदनिका ६१ अंदाजे किंमत ९.५० रुपये लक्ष मध्‍ये सदनिका बांधकामाचे स्‍थळ बडनेरा यवतमाळ रोड, झिरी मंदिर चे अलीकडे, गजानन नगर यवतमाळ रोड पासून ४०० मी. आत, नवसारी स.नं.१२९/२ सदनिका ८६ अंदाजे किंमत ९.०० रुपये लक्ष मध्‍ये सदनिका बांधकामाचे स्‍थळ अकोली रिंग रोड, महर्षी स्‍कूल जवळ गार्डन सिटी रेसीडेन्‍सीला लागुन रिंग रोड पासून १५० मी. आत (नवसारी गावाजवळ), रहाटगांव स.नं.१९९/३A सदनिका ४२ अंदाजे किंमत ९.०० रुपये लक्षमध्‍ये सदनिका बांधकामाचे स्‍थळ अकोली रिंग रोड, सेलिब्रेशन लॉन मागे अंदाजे १०० मी. आत (शिवनेरी नगर, वृंदावन कॉलनीजवळ), रहाटगांव स.नं.११६/२ सदनिका ३२ अंदाजे किंमत ९.०० रुपये लक्षमध्‍ये सदनिका बांधकामाचे स्‍थळ रहाटगांव आय.टी.आय. कॉलेज चे पूर्व बाजूला, रहाटगांव स.नं.१२७/२ सदनिका८२ अंदाजे किंमत ९.०० रुपये लक्षमध्‍ये सदनिका बांधकामाचे स्‍थळ नागपुर रोड, रहाटगांव चौक ते राजुरा पाणी टाकी रस्‍त्‍याचे बाजुला सात बंगला जवळ (प्रतिक विहार कॉलनी), अकोली स.नं.३१/१ सदनिका ५६ अंदाजे किंमत ९.०० रुपये लक्षमध्‍ये सदनिका बांधकामाचे स्‍थळ अकोली गांव हनुमान मंदिर समोर (भारसाकळे रेसीडेन्‍सी जवळ), गंभीरपुर स.नं.१४ सदनिका ४२ अंदाजे किंमत ९.५० रुपये लक्षमध्‍ये सदनिका बांधकामाचे स्‍थळ अकोली रिंग रोड, इमाम नगरचे विरुध्‍द बाजुस, मुक्‍तीजा मदरशा लालखडी चौक च्‍या मागे, तारखेडा स.नं.२४ सदनिका ५९ अंदाजे किंमत ९.५० रुपये लक्षमध्‍ये सदनिका बांधकामाचे स्‍थळ वलगांव रोड, महानगरपालिका अग्निशमक केंद्राचे बाजूला, सैफिया उर्दु स्‍कुल जवळ, बेनोडा (महादेवखोरी) स.नं.२६ सदनिका ७० अंदाजे किंमत ९.०० रुपये लक्षमध्‍ये सदनिका बांधकामाचे स्‍थळ महादेवखोरी टेकडीच्‍या पायथ्‍याशी निलकंठ ले आऊट, बालाजी नगर बुध्‍द विहार जवळ, बेनोडा (महादेवखोरी) स.नं.२७/२ सदनिका ८६ अंदाजे किंमत ९.०० रुपये लक्षमध्‍ये सदनिका बांधकामाचे स्‍थळ महादेवखोरी टेकडीच्‍या पायथ्‍याशी निळकंठ ले आऊट, बालाजी नगर, बुध्‍द विहार जवळ आहे.

  म्हसला, निंभोरा येथील सदनिकांचे ड्रॉ पद्धतीने लाभार्थ्याना वितरण करण्यात आले आहे. नविन लाभार्थ्याना बडनेरा, नवसारी, रहाटगांव, अकोली, गंभीरपुर, तारखेडा, बेनोडा येथील सदनिकेची मागणी करता येईल. अंदाजीत रकमेमधून शासनाचे अनुदान रु.२.५० लक्ष वगळता उर्वरित रकमेचा हिस्सा लाभार्थ्यांचा राहील.

       ड्रॉ करण्यापूर्वी लाभार्थी हिस्सा करीता लाभार्थ्यास बँक लोन किंवा नगदी ची हमी सादर करावी लागेल. हमी दिलेले लाभार्थी ड्रॉ करीता पात्र राहतील. ड्रॉ ची दिनांक व वेळ लाभार्थ्याना वेगळी कळविण्यात येईल.

अनामत रक्कम D.D स्वरूपात रु.४९,००० /- मा.आयुक्त महानगरपालिका अमरावती यांचे नावे राजापेठ सेतु केंद्रामधे जमा करावे लागेल व option form (भूखंड पसंती अर्ज) प्रधानमंत्री आवास योजना विभाग मनपा अमरावती  येथे सादर करावा लागेल. लाभार्थ्यांना एक रकमी अनामत रक्कम रु.४९,०००/- जमा करणे शक्य होत नसल्यास रु.२५,०००/- व रु.२४,०००/- या नुसार दोन टप्प्यात जमा करता येतील.परंतु दोन टप्प्यां मधील कालावधी एक महिन्याचे आत असावा. सदनिकांचे वितरण संगणकीय ड्रॉ पद्धतीने करण्यात येईल. शासन निर्णयानुसार आरक्षण निहाय SC,ST,NT,OBC व इतर लाभार्थ्यांचा ड्रॉ करण्यात येईल. आरक्षण - दिव्‍यांग : २%, SC :१०%, ST : ६%, NT :२%, OBC:३०%, इतर :५०% एकूण १००% राहील. खालचा माळा प्राधान्याने अपंग, जेष्ठ नागरिक यांना ड्रॉ पद्धतीने वितरीत केल्या जाईल. लाभार्थ्याना जात प्रमाणपत्र व दिव्‍यांग असल्यास दिव्‍यांगाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

इमारत बांधकाम G+३ (चार माळे) आर.सी.सी फ्रेम स्ट्रक्चर राहील. प्रत्येक सदनिकेचे चटई क्षेत्रफळ ३०.०० चौ.मी. किंवा ३२३ चौ.फूट (हॉल,बेडरूम,किचन,संडास,बाथरूम व बाल्कनी) इतके राहील.पिण्याचे पाणी, दोन चाकी वाहन पार्किंग करीता मोकळी जागा, अप्रोच रस्ता, विद्युत पुरवठा व बाहेरील परिसर सोलर स्ट्रीट लाईट, संरक्षण भिंत (compound wall) अशी सुविधा उपलब्‍ध करण्‍यात येणार आहे.ड्रॉ पद्धतीने वितरण झाल्यावर लाभार्थ्याना सदनिका वितरण पत्र दिल्या जाईल व दुय्यम निबंधक कार्यालयातून ईसारचिट्टी करुन देण्यात येईल. लाभार्थ्याना लाभार्थी रकमेचा हिस्सा सदनिका बांधकामाच्या प्रगतीनुसार ५ टप्प्यामधे प्रधानमंत्री आवास योजनाच्या बॅंक खात्यामधे वळती करावी लागेल याबाबत लाभार्थ्याना पत्राव्दारे अवगत केल्या जाईल.सदर भुखंडावरील सदनिका वितरीत केलेल्या लाभार्थ्याना लाभार्थी हिस्सापोटी अंतिम टप्पा प्रधानमंत्री आवास योजनेच्या बँक खात्यामधे जमा केल्यावर दुय्यम निबंधक कार्यालयातून खरेदी प्रक्रिया पूर्ण करून सदनिका हस्तांतरीत केल्या जाईल व त्यानंतरची देखभाल व दुरुस्ती ची जबाबदारी गाळे धारकाची राहील. तसेच संयुक्तिक परिसराची (comman area)  देखभाल करण्याची जबाबदारी हि सदनिकेमधे राहणाऱ्या सर्व सदस्यांची राहील.D.D राजापेठ सेतु केंद्रामध्ये जमा करणे व सेतु केंद्रामधे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे करीता आवश्यक कागदपत्रे कुटुंबातील सदस्‍यांचे आधार कार्ड, उत्पनाचा दाखला, राशन कार्ड, बँक पास बुक, जात प्रमाणपत्र, अपंगत्व असल्यास अपंगत्वाचे  प्रमाणपत्र, भाड्याचे घरात राहात असल्याचा घर मालकाचा दाखला व प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.

             ड्रॉ पद्धतीने लाभार्थ्यांच्या प्रथम पसंती नुसार सदनिका वितरीत न झाल्यास लाभार्थ्याने दिलेल्या दूसऱ्या / तिसऱ्या पसंतीनुसार भूखंडावरील ड्रॉ मधे नाव समाविष्ट केल्या जाईल. तसेच सदनिका देण्याचे अधिकार मा.आयुक्त महानगरपालिका अमरावती यांचेकडे राखीव आहेत. ड्रॉ पद्धतीने लाभार्थ्यांने एकाच भुखंडाची निवड केल्यास व ड्रॉ मधे सदनिका वितरीत न झाल्यास D.D स्वरूपात जमा केलेली रक्कम रु.४९,०००/- लाभार्थ्यांचे विनंती अर्जानुसार परत केल्या जाईल. सदनिकेचा ताबा लाभार्थ्याकडून लाभार्थी हिस्सा पूर्णत: प्राप्त झाल्यावर दुय्यम निबंधक कार्यालय अमरावती येथे खरेदी करुन दिल्या नंतर दिल्या जाईल. प्रत्येक सदनिकेचे विद्युत मीटर वेगळे असेल व विद्युत बील लाभार्थ्यास भरावे लागेल. थ्री फेज connection वाटर पंप हाऊस करीता एकत्रित असेल. विद्युत वापराचे विज देयके सामाईक भरावे लागेल. सदर घटका अंतर्गत सद्यास्थितीत पूर्ण बांधकाम झालेल्या सदनिकांची नमूना पाहणी लाभार्थ्यांस मौजा म्हसला स.नं.२१/फ (तपोवन परिसर कृष्णा नगर अमरावती) येथे करता येईल. राज्य शासनाच्या मार्गदर्शक अटी शर्तीनुसार प्रधानमंत्री आवास योजना मधील सदनिका वितरीत केलेल्या लाभार्थ्यास १० वर्ष विकता किंवा भाडे तत्वाने देता येणार नाही. सदर योजना दिनांक ३१/०३/२०२२ रोजी संपुष्टात येत असल्याने विकासकास (कंत्राटदार) इमारत बांधकाम ३१/०३/२०२२ पूर्वी पूर्ण करावयाचे आहे.

प्रधानमंत्री आवास योजना घटक क्र.३ अंतर्गत सदनिका विकत घेणा-या लाभार्थ्‍याकरीता शहर स्तरीय तांत्रिक कक्ष, टाऊन हॉल, नेहरू मैदान, अमरावती येथे संपर्क साधावा.
Previous Post Next Post
MahaClickNews