दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक सुविधा द्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक सुविधा द्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

नंदुरबार, दि. 19 : जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळतील याकडे विशेष लक्ष देण्यात यावे आणि लसीकरणानंतरदेखील नागरिकांनी मास्कचा वापर आणि शारीरीक अंतर राखणे या बाबींचे करावे यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात यावीअसे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.


धडगाव येथे आयोजित जिल्हा आढावा बैठकीत श्री.ठाकरे बोलत होते. बैठकीस आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवीकृषि मंत्री दादाजी भुसेमुख्य सचिव सीताराम कुंटेआरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यासजि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवीआमदार मंजुळा गावितमाजी आमदार चंद्रकांत रघुवंशीविभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेजिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुडमुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडेपोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोना संसंर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात यावा. यावेळी एक ढाल म्हणून लसीकरणाची सुविधा आपल्याकडे आहे. लसीकरणाबाबत जनतेच्या मनातील शंका दूर करून लसीकरणाचा वेग वाढवावा. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वत्र पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.  जिल्ह्याने जनजागृतीचे चांगले उपक्रम राबविले असून त्यात यापुढेही सातत्य राखण्यात यावे, असे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

Previous Post Next Post
MahaClickNews