सभागृह नेता तुषार भारतीय यांनी घेतली विभागप्रमुखांची बैठक

अमरावती प्रतिनिधी, 
सभागृह नेता तुषार भारतीय यांनी आज विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विभागप्रमुखांना स्पष्ट सुचना दिल्या  की, काम हे गतीमान पध्दतीने झाले पाहिजे. मागील वर्षी अनेक संकटांना समोर जात आपण मार्गक्रमण केले आहे. या वर्षात प्रत्येकाने आपले काम दुप्पट कार्यक्षमतेने करणे अपेक्षित आहे. विभागाकडे जे काम असेल ते लवकर पुर्ण करुन नविन काम प्रस्ता‍वित करावी. संथगतीने काम केल्यास विभागप्रमुखास जबाबदार धरण्यात येईल. बांधकाम विभागाने त्वरीत टेंडरची प्रक्रिया सुरु करुन सर्व कामे पुर्नत्वास नेणे अपेक्षित आहे. सहाय्यक संचालक नगर रचना विभागाने महानगरपालिकेकडे असलेल्या सर्व जागांची नोंद करुन त्यावरील अतिक्रमण हटवावे. स्वच्छता विभागाने प्रभागात जे संपर्क कार्यालय दिले आहे ते सुरळीत करावे. बाजार व परवाना विभागाने मार्केटचे रेट ठरविण्यासाठी त्वरीत कार्यवाही करणे अपेक्षित आहे. पुढील आमसभा ऑफलाईन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. नगरसेवकांच्या प्रश्नांची उत्तरे त्वरीत देणे अपेक्षित आहे. सभागृह नेता या नात्याने मी नेहमी विभागप्रमुखांसोबतच राहील पण तेवढीच जबाबदारी आपलीही राहील. नगरसेवकांच्या कामांना प्राधान्य देणे हे सर्वात महत्वाचे कार्य आहे. १५ ऑगस्ट पर्यंत वार्ड ऑफिस व सी.सी.टि.व्ही्. कॅमेरे लावण्याचे कार्य पुर्ण झाले पाहिजे. विभाग प्रमुखाने इतर विभाग प्रमुखांशी समन्वय ठेवावा. कायद्याच्या  चौकटीत राहून सकारात्मक कार्य आपण केले पाहिजे. आपण सगळे मिळून मार्ग काढून महानगरपालिकेच्या‍ कार्याला गतीमान करु.
या बैठकीला विभागप्रमुख उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews