मलकापूर :प्रतिनिधी
फोटोग्राफर व त्यांच्या परिवाराच्या सुरक्षितेच्या दृष्टीने संजय खर्च व
प्रेस फोटोग्राफर योगेश शर्मा व यांच्या पुढाकारातून मलकापूर तालुक्यातील व शहरातील समस्त फोटोग्राफर बांधवांना लसीकरण करण्यात आले गत वर्षापासून कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे अशा परिस्थितीत फोटो ग्राफर बंधूंना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागत आहे नियमाचे पालन करीत होणारे विविध कार्यक्रमात त्यांना उपजिवीकेचे दृष्टीने आपला व्यवसाय सांभाळून करावा लागत आहे शासन-प्रशासन या घटकाकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे परिवार चालविण्याकरिता या घटकांना सद्यस्थितीत मोठी धडपड करावी लागत आहे अशावेळी स्वतःचे व परिवाराचे आरोग्य सुरक्षित रहावे या दृष्टीने मोठी काळजी घ्यावी त्या अनुषंगाने ज्येष्ठ फोटोग्राफर मदन केला यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ज्येष्ठ फोटोग्राफर संजय खर्चे व प्रेस फोटोग्राफर योगेश शर्मा यांच्या पुढाकाराने समस्त फोटोग्राफर बांधवांना खाजगी रुग्णालयात मोफत लसीकरण करण्यात या लसीकरणाला डॉक्टर रिया चोपडे यांचे विशेष सहकार्य लाभले लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत गावंडे, बाळू सावंत, अनिल ठाकूर, पंकज देविकार, मुकेश सुरपाटने, विनोद चौधरी, सुरेश चतुर ,आनंद वाघ ,अतुल तांदुळे ,गणेश चोपडे , अनिल गोठी, गणेश नाफडे ,यांनी परिश्रम घेतले