अमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा! महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद

अमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा!  महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद


घरातील स्वयंपाक करणं हे महिलांचं रोजचं कामच आहे,पोळ्या करणं हा तसा प्रत्येक महिलेच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे....पण राजकारणाच्या धकाधकीत या गोष्टींसाठी महिला राजकारणांंना वेळ मिळत नसतो... पण अमरावतीच्या पालकमंत्री व राज्याच्या महिला, बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढत ही संधी साधली. 

अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार येथे संजय चौधरी यांच्या आग्रहाखातर जेवणासाठी यशोमती ठाकूर गेल्या होत्या. यावेळी तिथे महिला मोठ्या प्रमाणात पोळ्या लाटत होत्या. यात यशोमती ठाकूर या भगिनींसोबत मिसळत त्यांनी सामान्य महिलांन प्रमाने पोळ्या लाटण्याचा आनंद घेतला. अनेक दिवसांनी पोळ्या करण्याची संधी मिळाल्याने आनंद वाटल्याचे यावेळी ठाकूर यांनी सांगितले.

Previous Post Next Post
MahaClickNews