प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांची उचलबांगळी-शिवकुमार निलंबन -दिपाली चव्हाण आत्महत्याप्रकरण

अमरावती.वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, एम.एस.रेड्डी यांची या पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. 
दिपाली चव्हाण यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या वर्तणुकीबाबत वेळोवेळी अवगत करुनही एम. एस. रेड्डी, त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. ही बाब देखील गंभीर असल्यामुळे त्यांना सदर पदावरुन अन्यत्र पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. यास्तव, रेड्डी यांची अन्यत्र पदस्थापना होईपर्यंत त्यांना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), नागपूर यांचे कार्यालयात हजर राहून पुढील आदेशाची प्रतिक्षा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सद्यस्थितीत त्यांच्या पदाचा कार्यभार मुख्य वनसंरक्षक प्रविण चव्हाण यांचेकडे सोपविण्यात आला आहे. चव्हाण यांच्या आत्महत्येसंदर्भात शिवकुमार यांचेविरुध्द धारणी पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान संहितेमधील कलम 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. यास्थितीत उपवनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदरा या पदाचा अतिरिक्त कार्यभार उपवनसंरक्षक (वन्यजीव), सिपना विभाग अविनाश कुमार, यांचेकडे देण्यात आला आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews