अमरावती २३ अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासह , शारीरिक तंदुरुस्ती व क्रीडांगुणांना प्रोत्साहन देण्याला घेऊन आ. सौ सुलभाताई खोडके यांनी शहराच्या क्रीडा विकासासाठी ५१ लाखांचा निधी शासनाच्या क्रीडा विभागाकडून मंजूर करून आणला आहे . सदर कामांना प्रशासकीय मान्यता देखील मिळाल्याने आता लवकरच शहराच्या क्रीडा विकासात ओपन जीम व क्रीडांगणाची नव्याने भर पडणार आहे .
अमरावती शहरी भागाचा झपाट्याने विस्तार होत असून या भागात पायाभूत सुविधांची पूर्तता तसेच नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी आवश्यक विविध बाबींची उपलब्धता ,याबाबत आ. सुलभाताई खोडके यांनी प्रयत्नांची मालिकाच राबविल्याने शहरात विकास पर्व नांदताना दिसत आहे . अशातच आ. सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने शासनाच्या क्रीडा विभागाकडून अमरावती शहरी भागाकरिता ५१ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे . या अंतर्गत शहरात सहा ठिकाणी ३० लक्ष निधीतून ओपन जीम साकारण्यात येणार असून तीन ठिकाणी २१ लक्ष निधीतून क्रीडांगणांच्या चेनलिंग फेंसिंगची कामे होणार आहे . सदर कामांना प्रशासकीय मान्यता देखील मिळाली असून या कामांच्या पूर्ततेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे . शासनाच्या क्रीडा विकास धोरणांतर्गत अमरावती शहरी भागात ओपन जीम निर्मिती व क्रीडांगणांच्या दुरुस्ती व विकासासाठी ५१ लाखांचा निधी मंजूर केल्या बद्दल आ. सौ .सुलभाताई खोडके यांनी राज्याचे क्रीडा व युवक कल्ल्याण मंत्री ना. सुनील केदार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे .
*५१ लक्ष निधीतून कामांचे नियोजन*-
रहाटगाव स्थित पराग टाऊन शिप- ओपन जीम- ५ लक्ष.
अमृत विश्व वसाहत -ओपन जीम - ५ लक्ष.
गिरीजा विहार कॉलनी- ओपन जीम- ५ लक्ष.
नवसारी स्थित श्रम साफल्य कॉलनी -ओपन जीम- ५ लक्ष.
यशोमंगल लेआऊट -ओपन जीम - ५ लक्ष
शेगाव स्थित अयोध्या कॉलनी - ओपन जीम - ५ लक्ष.
*क्रीडांगणाचे चेनलिंग फेंसिंग*
रहाटगाव स्थित गोमतीबाई बजाज कॉलनी - ७ लक्ष.
नवसारी- मेघे लेआऊट - ७ लक्ष.
शेगाव दामोदर कॉलनी -७ लक्ष.
*बॉक्स* ---- नागरिकांना शारीरिक तंतुरूस्तीतून सुदृढ आरोग्य व तणाव विरहित जीवन जगता यावे यासाठी शहरातील क्रीडा विकासाला आपले सर्वोतोपरी प्राधान्य आहे .शहरात विविध ठिकाणी ओपन जीम निर्मिती व क्रीडांगणाची दुरुस्ती साठी शासनाकडून ५१ लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता देखील मिळविली असल्याने लवकरच क्रीडांगणांना नवी चकाकी येऊन जेष्ठ नागरिक , महिला व युवती तसेच बालक वर्गाला चांगली सुविधा मिळणार आहे -आ.सौ .सुलभाताई खोडके खोडक