दिल्ली, दि.23 : 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये ‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील चित्रपटांमध्ये ‘आनंदी गोपाळ’ आणि ‘ताजमाल’ या मराठी चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आज 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये विविध श्रेणीत मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे.
‘बार्डो’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट