लॉकडाऊन : एक वर्ष पुर्ण मात्र परिस्थिती आणखी ‘गंभीर’-अडचणी वाढल्या, बरच काही झाले आभासी

अमरावती.
22 मार्च 2020 हा भारत देशाकरिता ऐतिहासिक आणि अविस्मरणीय दिवस राहिल. कारण भारत देशाने पहिल्यांदा लॉकडाऊन पाहिले होते, पहिल्या दिवशी सहज वाटणारे लॉकडाऊन पुढचे सहा महिने किती गंभीर होत गेले हे प्रत्येकानेच अनुभवले. या लॉकडाऊनला आज एक वर्ष पुर्ण होत आहे. मात्र ज्या कोरोना संक्रमणाला थांबविण्याकरिता हे लॉकडाऊन करण्यात आले होते, त्या कोरोनाची परिस्थिती त्या दिवसाच्या तुलनेत कितीतरी पटीने गंभीर आहे. 

अडचणींमध्ये वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन घोषीत केल्यावर पोलिसांव्यतिरिक्त कुणीच रस्त्यावर दिसत नव्हते. काही समाजसेवी संघटना, समाजसेवक भुकलेल्यांना, पायदळ घरी जाणार्या मजुरांना अन्नदान करतांना दिसत होते. जितक्या वेगाने कोरोना वाढला नसेल तितक्या वेगाने लोकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. सर्वच क्षेत्रांवर त्याचा विपरीत परिणाम झाला. अजूनही त्यातून सावरण्याची चिन्हे दिसत नाहीत. अजुनही अनेकजण त्या लॉकडाऊनने झालेल्या आर्थिक होरपळीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करित आहे. 

आभासी शिक्षणाला सुरुवात
अजुनही कोरोनाच्या व लॉकडाऊनच्या दृष्टचक्रातून कधी सुटका होईल, ठामपणे सांगता येणार नाही. काही चांगल्या बाबीही या लॉकडाऊनमुळे आत्मसात करता आल्या. प्रामुख्याने शिक्षणासाठी नवनवीन प्रयोग यशस्वी ठरले. ऑनलाईन शिक्षण, ऑनलाईन प्रात्यक्षिके, ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईन प्रशिक्षण, चर्चासत्रे, परिसंवाद आयोजनाची प्रथा सुरू झाली. अगोदरही ऑनलाईनची सुविधा होती; पण मोजक्याच घटनेसाठी तिचा उपयोग केला जायचा. आता ही सुविधा सर्वमान्य झाली आहे.
कोरोना महामारीमुळे ऑनलाईनला जास्त महत्त्व आले. वर्गात शिकवले जाते; तसेच ऑनलाईन वर्ग घेण्यात येतात. प्रात्यक्षिकेही ऑनलाईन घेतली जातात. मुले समोर ठेवून त्यांच्यासोबत संवाद साधत शिक्षक प्रयोगशाळेत ऑनलाईन प्रात्यक्षिक करून दाखवतात. कोणी त्याचे शूटिंग करून त्याची व्हिडिओ क्लिप विद्यार्थ्यांना पाठवतात. एवढेच नव्हे तर विविध देशांतील जागतिक कीर्तीचे विषयतज्ज्ञ मुलांना ऑनलाईन मार्गदर्शन करतात. परिसंवाद, चर्चासत्रांत सहभागी होतात. यासाठी अगोदर त्यांना निमंत्रित करून महाविद्यालयामध्ये आणले जायचे. येण्यासाठी अनेकदा त्यांच्याकडे वेळ नसायचा. आता ते जिथे आहेत, तेथूनच मार्गदर्शन करतात. यामुळे मोठा खर्च व त्यांचा येण्या-जाण्याचा वेळदेखील वाचत आहे.

लॉकडाऊन न परवडणारे
‘जान है तो जहान है’ या उक्तीवर ठाम राहत अनेक व्यापार्यांनी तब्बल सहा महिने लॉकडाऊनला सहकार्य केले. या लॉकडाऊन ना भुतो असे आर्थिक नुकसान केले, अनेकांच्या नोकर्या गिळल्या. आत्महत्या वाढल्या मात्र ज्या करिता लॉकडाऊन लावण्यात आला होता. ते शक्य झाले नाही, कोरोनाचे संक्रमण वाढले आणि वाढत जात आहे. आता हे लॉकडाऊन कुणालाही परवडण्यासारखे राहिले नसून कोरोना संक्रमणाला रोखण्याकरिता स्वयंशिस्त पाळून त्रिसुत्री व पंचसुत्री अवलंबिणे महत्वाचे आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews