अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन
अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे मंगळवारी निलंबन करण्यात आले. महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. यावेळी रेड्डी यांच्या निलंबनाचा मुद्दा रेटून धरला. अखेर मुख्यमंत्री कार्यालयातून विशेष बाब म्हणून रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित करण्यात आले