शहरातील मनपा च्या सर्व आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण सुरू करा : मिलिंद बांबल
अमरावती :- कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण व्हावे यासाठी संपूर्ण देशासोबतच अमरावती शहरातील अनेक केंद्रावर 60 वर्षी वरील सर्व जेष्ठ नागरिकांना तसेच 45 ते 60 वर्षे या वयोगटातील ज्या व्यक्तींना सहव्याधी ( को-मोरबीडीटी ) असेल त्यांनी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडुन सहव्याधी प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे लस अत्यंत सुरक्षित असून प्रत्येकाने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे पण शहरात अजूनही मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरिक लसीकरणापासून वंचित आहे जेष्ठ नागरिकांना लस घेणे सोयीचे व्हावे यासाठी अमरावती महानगरपालिकेने अंबापेठ - गौरक्षण प्रभागातील भुतेश्वर चौकातील महानगरपालिकेच्या सार्वजनिक दवाखान्या मध्ये जेष्ठ नागरिकांना मोफत कोरोनाची लस उपलब्ध करून द्यावी या मागणी साठी मनपाचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन दिले तसेच निवेदनाची प्रत मनपा आयुक्त मा. प्रशांतजी रोडे साहेब यांना सुध्दा पाठविन्यात आली मनपाने सर्व आरोग्य केंद्रावर जेष्ठ नागरिकांना वैक्सिनेशन चि सोय उपलब्ध करून दिल्यास त्या भागातील नागरिकांना सोयीचे होईल.