पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम माविम'तर्फे मायग्रंट सपोर्ट सेंटरचे सोमवारी उदघाटन

अमरावती, दि. २१ : _महिला आर्थिक विकास महामंडळाच्या  (माविम) मायग्रंट सपोर्ट सेंटरचे उदघाटन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत उद्या (२२ मार्च) सकाळी ११ वाजता होणार आहे._

पालकमंत्र्यांचा दि. २२ व २३ मार्च रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे : दि. २२ मार्चला सकाळी १०.५५ वाजता निवासस्थान येथून 'माविम'कडे प्रयाण, सकाळी ११ वाजता मायग्रंट सपोर्ट सेंटरचा शुभारंभ, सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण, सकाळी ११.३५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह क्र. १ येथे विभागीय व जिल्हा क्रीडा समितीची बैठक, दुपारी १२ वाजता जलसंपदा विभागाच्या विविध जल प्रकल्पाबाबत बैठक, दुपारी १ वाजता ग्रामीण आवास योजनांबाबत बैठक, दुपारी १.३० वाजता नागरी आवास योजनांबाबत बैठक, दुपारी २ वाजता कृषी विभागाच्या विविध योजना व नैसर्गिक आपत्ती मदत याविषयी बैठक, दु. २.४५ वाजता निवासस्थानी प्रयाण, दु. २.५० वाजता निवासस्थानी आगमन व राखीव, दु. ३.३० वा. ज्येष्ठ पत्रकार दिलीप एडतकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, दुपारी ४ वाजता विशी, ता. भातकुली येथे स्व. गौतम मेश्राम यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, सोईनुसार निवासस्थानी आगमन व राखीव.

दि. २३ मार्चला अमरावती निवासस्थान येथून सकाळी ८ वाजता यवतमाळला प्रयाण व यवतमाळला विविध कार्यक्रम, दुपारी ४.१५ वाजता यवतमाळहून नागपूरला प्रयाण, रात्री ८.४५ वाजता नागपूर विमानतळावरून मुंबईला प्रयाण.
Previous Post Next Post
MahaClickNews