डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा 1 हजार 584 विद्यार्थ्यांना लाभ मागासवर्गींयांच्या कल्याणार्थ योजनांवर 47 कोटी निधी खर्च

अमरावती, दि. 20 : मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाव्दारे विविध योजना राबविल्या जातात. वर्ष 2020-21 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत जिल्ह्याला 4 कोटी 52 लाख 60 हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला होता. तो शंभर टक्के खर्च करण्यात आला असून 1 हजार 584 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात आला, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त मंगला मून यांनी दिली.

                        शासनाच्या सामाजिक न्याय विभागाव्दारे मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी  योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यात समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयाव्दारे योजनांची अंमलबजावणी होते. यामध्ये प्रामुख्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परिक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती/ गुणवत्ता पुरस्कार, सैनिकी शाळा निर्वाह भत्ता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमा अंतर्गत अत्याचार ग्रस्त पिडीतास अर्थसहाय्य तसेच इतरही सामुहीक लाभाच्या योजना राबविण्यात येतात.

                  सन 2020-21 या आर्थिक वर्षात सहायक आयुक्त (समाजकल्याण) जिल्हा कार्यालयाकडे राज्यस्तरीय मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांवर 47 कोटी रुपयाचा निधी खर्च झालेला आहे. यामध्ये प्रामुख्याने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेत 4 कोटी 52 लाख 60 हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला होता, तो शंभर टक्के खर्च करण्यात आला असून जिल्ह्यातील 1 हजार 584 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

                 अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत अत्याचारग्रस्त पिडीतास मदत करण्यासाठी 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेलाआहे. अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत 1 कोटी 1 लाख 70 हजार रुपयाचा प्राप्त निधी योजनांच्या अंमलबजावणीसाठी शंभरटक्के खर्च करण्यात आला आहे. अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत जिल्हास्तरीय योजनांचा प्राप्त निधी राज्यात सर्वात प्रथम जिल्ह्याने शंभर टक्के खर्च केला आहे, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त मंगला मून यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे
Previous Post Next Post
MahaClickNews