महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून यांची माहिती

अमरावती, दि. 22 : सामाजिक न्याय योजनांच्या विविध योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून यांनी दिली.

श्रीमती मून म्हणाल्या की, सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आदी योजना राबवल्या जातात. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या नवीन व नूतनीकरणाच्या अर्ज भरण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व संस्था व महाविद्यालयांनी या मुदतीत http://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळाचा वापर करून ऑनलाईन अर्ज भरावे, असे आवाहन श्रीमती मून यांनी केले.

विहित वेळेत अर्ज भरून घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांची असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews
MahaClickNews