भाईपुर इथं कोरोना लसीकरण शिबीर ९० नागरिकांनी घेतली लस

मोर्शी/तालुका प्रतिनिधी- कोरोना उद्रेकाच्या पृष्टभुमीवर   सामाजिक कार्यकर्ते अंकुश  बनसोड व प्रकाश राऊत यांच्या पुढाकाराने भाईपुर इथं आज २३ एप्रिल रोजी कोरणा लसीकरण कॅम्प घेण्यात आला. यावेळी ९० नागरिकांनी लसीकरण करून घेतले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यामुळे ग्रामीण भागात कोरोना बाधित  रुग्णाची संख्या झपाट्यानं वाढली आहे.परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळं यापासून सुरक्षित राहण्यासाठी कोरोना लस घेणं महत्वाचं आहे.त्या पृष्ठभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अंकुश बनसोड यांनी हा कॅम्प आयोजित केला होता.यामध्ये येथील ९० पुरुष व महिलांनी लसिकरण करून घेतले.कॅम्पसाठी डॉ वैभव वानखडे,सरपंच श्रीमती जया राऊत,समुदाय आरोग्य अधिकारी छबु गायकवाड,अरविंद वानखडे यांचे सहकार्य लाभले.ग्रामसेवक पांचाळे,सुनील धुर्वे,वैशाली चौधरी,सत्यवती महेंद्र,सुनंदा काळे यांचे सहकार्य लाभले.
Previous Post Next Post
MahaClickNews