सूतिकागृहाच्या कामांसाठी १ कोटी ६१ लाख निधी प्राप्त आमदार सुलभा खोडके यांच्या प्रयत्नांना यश


अमरावती दिनांक १०  
  अमरावती महापालिका क्षेत्रांतर्गत प्रभाग क्रमांक ५ महेंद्र कॉलनी भागात परिपूर्ण बांधकाम असलेली मनपाची इमारत ही बंद अवस्थेत असल्याने निरुपयोगी ठरत आहे. या इमारतीत स्थानिक परिसरवासीयांकरिता प्राथमिक रुग्णालय व सूतीकागृह उभारून आरोग्य सेवा उपलब्ध करण्याला घेऊन आ.सुलभाताई खोडके यांनी शासन दरबारी  सातत्य पूर्ण प्रयत्न चालविले आहे . कोविड माहामारीच्या काळात या इमारतीचा आयसोलेशन करिता वापर व पुढील काळात अद्यावत रुग्णालयासह १०० खाटांचे सुतीका गृह कार्यान्वित करण्यासाठी आ. सुलभाताई खोडके यांनी  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांच्या कडे ५ कोटींच्या निधीची मागणी केली होती . याची  फलश्रुती म्ह्णून आता पहिल्या टप्यात  १ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी आ. सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने अमरावती महापालिकेस प्राप्त झाला आहे . याबद्दल आ. सुलभाताई खोडकें यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे . 
अमरावती शहराचा झपाट्याने विस्तार होत असून स्थानिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शहराच्या मध्य भागात असलेले रुग्णालय लांब पडत आहे. त्यामुळे शहरांतर्गत  मनपाच्या शहरी आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य विषयक सुविधा निर्माण करून येथील वैद्यकीय सेवा अधिक वृदिंगत करण्यावर आ. सुलभाताई खोडके यांच्या द्वारे सातत्यपूर्ण भर दिला जात आहे . अशातच मनपा प्रभाग क्रमांक ५ महेंद्र कॉलनी भागातील रुग्णालयाची इमारत ही बंदावस्थेत असल्याने निरुपयोगी ठरत होती . त्यामुळे या इमारतीत १०० खाटांचे सूतिकागृहं सुरु करण्यासाठी आ.सुलभाताई खोडके यांनी पुढाकार घेतला . दरम्यान  गेल्या ८ फेब्रुवारी २०२१ रोजी अमरावती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन आढावा बैठकीत आ. सुलभाताई खोडके यांनी मुद्दा उपस्थित  करून निधीचे नियोजन करण्या संदर्भात विनंतीपूर्वक मागणी केली. मनपा सूतिकागृहाच्या बंद  इमारतीत आरोग्य सुविधा, मनुष्य बळ व तांत्रिक बाबींची पूर्तता होण्या करीता अंदाजे ५ कोटी इतक्या निधीची निकड असल्याबाबतही आ.सुलभाताई खोडके यांनी उपमुख्यमंत्री महोदयांना चर्चे दरम्यान अवगत केले. यावर उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री  ना.अजितदादा पवार यांनी ८ फेब्रुवारी रोजीच्या बैठकीच  अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निधीच्या संदर्भात नियोजन करण्याच्या सूचना केल्यात .अशातच आता अमरावतीकरिता शासनाकडून कोविड उपाययोजनांसाठी मिळालेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपैकी १ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी महेंद्र कॉलनी प्रभागातील मनपा सूतिकागृहाच्या कामांसाठी खर्च करण्यात येणार आहे . सदरचा १ कोटी ६१ लाख  निधी अमरावती महानगर पालिकेला वितरित करण्यात  असून  त्यामध्ये   स्थापत्य कामांकरिता ६९ लक्ष रुपये तर विद्युतीकरणाच्या कामासाठी १५ लक्ष रुपये व मेडिकल साधन सामुग्री उपलब्धीसाठी जवळपास ७७ लक्ष रुपये अशा खर्चाचे  अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे . सद्या कोविड महामारीचा काळ लक्षात घेता या इमारतीचा वापर कोविड सेंटर साठी देखील करता येत असल्याने सदर इमारतीत  लवकरच  आवश्यक दुरुस्तीची कामे व फर्निचर व्यवस्था तसेच मेडिकल साधन सामग्री आदीं बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला दिल्या आहेत .सद्या कोरोनाचा काळ असल्याने मनपाचे सूतिकागृह कोविड सेंटर मध्ये रूपांतरित होणार असून कोरोनाचा  काळ संपल्यानंतर येथे  १०० खाटांचे सूतिका गृह कार्यान्वित होणार आहे . आ. सुलभाताई खोडके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे रुग्णालयीन सेवेचा विषय मार्गी लागला असल्याने महेंद्र कॉलनी प्रभागासह  आसपासच्या परिसरातील नागरिकांना आता परिपूर्ण अशा आरोग्य सेवा-सुविधांचा पर्याप्त लाभ होणार आहे. तसेच अमरावतीच्या आरोग्य सेवेतही नव्याने भर पडणार असल्याने शहराला आरोग्य संजीवनी मिळाली आहे . 
Previous Post Next Post
MahaClickNews