अमरावती महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले साफ करावे - सभागृह नेता तुषार भारतीय

अमरावती प्रतिनिधी,

नाल्‍यांच्‍या साफ सफाई बाबत उपाययोजनेच्‍या अनुषंगाने सोमवार दिनांक २६ एप्रिल,२०२१ रोजी अमरावती महानगरपालिकेतील सभागृह नेता तुषार भारतीय यांच्‍या कार्यालयामध्‍ये बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. या बैठकीत नगरसेविका सुरेखा लुंगारे, नगरसेवक बलदेव बजाज, नगरसेवक अजय सारसकर, वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ.सिमा नेताम, अतिक्रमण पथक प्रमख अजय बन्‍सेले, उपअभियंता श्री अनवाणे, अभियंता अजय विंचुरकर उपस्थित होते.

अमरावती जिल्‍ह्यामध्‍ये साधारणतः जुन महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यात पर्जन्‍यमानास सुरुवात होते. नैसर्गिक आपत्‍तीच्‍या निवारणार्थ अमरावती महानगरपालिकेच्‍या हद्दीमध्‍ये महापालिकेची यंत्रणा सज्‍ज असणे आवश्‍यक आहे. महानगरपालिकेच्‍या विविध विभागांनी पार पाडावयाच्‍या जबाबदा-या संदर्भात सभागृह नेता तुषार भारतीय यांनी आज प्राथमिक बैठक घेतली. स्‍वच्‍छता विभागाने शहरातील सर्व छोट्या नाल्‍यामध्‍ये असणारा गाळ व कचरा पूर्णपणे साफ करावा. शहरातील अठरा मोठे नाले व एकोणविस छोटे नाल्‍या संदर्भात अति‍क्रमण विभागाने माहिती दिली. यावेळी सदर विभागाने आतापर्यंत सहा नाले साफ केल्‍याचे सांगितले. सभागृह नेता तुषार भारतीय यांनी अतिक्रमण विभागाला सक्‍त निर्देश दिले की, पावसाळापूर्वी शहरातील सर्व नाले साफ झाले पाहिजे. नाल्‍यातला गाळ त्‍वरीत उचलून घ्‍यावे. तसेच सर्व लहान मोठ्या नाल्‍यांची रोजची साफ सफाईची माहिती देण्‍यात यावी. तसेच वेळ पडल्‍यास पोकलॅंन्‍ड व जेसीपी वाढविण्‍याबाबत सक्‍त निर्देश देण्‍यात आले. सर्व प्रभागातील स्‍वास्‍थ निरीक्षकांकडुन व कंत्राटदाराकडुन सर्व नाल्‍याची यादी तयार करुन त्‍या नाल्‍याची साफ सफाई करण्‍याबाबत निर्देश दिले.   

सभागृह नेता तुषार भारतीय यांनी यावेळी व्‍यापारी वर्ग व नागरीकांना आवाहन केले की, त्‍यांनी नाल्‍यात कोणत्‍याही प्रकारचा कचरा टाकू नये. नाल्‍यात कचरा टाकल्‍यामुळे पाण्‍याच्‍या प्रवाहात अडथळा निर्माण होवून पुर परिस्थिती निर्माण होवू शकतो. नागरीकांनी नाल्‍यात कचरा स्‍वतःहा टाकू नये व इतरही कोणाला टाकू देवू नये असे या बैठकीत सुचित करण्‍यात आले.
Previous Post Next Post
MahaClickNews