मोरगाव पालकमंत्र्याकडून दीपालीच्या कुटुंबियांची सांत्वना

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन परिक्षेत्र अधिकारी या पदावर कार्यरत  असलेल्या स्व दीपाली चव्हाण या  एक कर्तव्यदक्ष धाडसी महिला वनअधिकारी होत्या.त्यांचा आत्महत्येची घटना अतिशय दुर्दैवी आहे, मन पिळवटून टाकनारी आहे. ही वेदना,दुःख व्यक्त करायला शब्दच नाही.कारण ते या सर्वांपलीकडचं आहे.अशा शब्दात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्यातीच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकुर यांनी आज ४ एप्रिल  रोजी थेट मोरगाव इथं भेट देऊन त्यांनी चव्हाण कुटुंबियांची सांत्वना केली.

यावेळी दिपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी विस्तृत घटनाक्रम उलगडला.वरिष्ठ त्यांचा कसा अमानवीय छळ करीत होते याची माहिती दिली,तर त्यांचा सासू यांनी दीपाली यांच्या बोलतांना त्यांना अश्रूंना वाट मोकळी करून दिली.दीपाली ही आमची सून नव्हेतर मुलगीच होती.अस सांगून त्या म्हणाल्या की अधिकारी।असल्याचा तिला कधीच गर्व नसायचा.

आपल्या करर्तव्यात  कधीचं कसूर करीत नसे. पण वरिष्ठ असलेल्या शिवकुमार यांनी तिचा भयंकर छळ केला.याबात।मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना सुद्धा याची माहिती दिली होती. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं,त्यामुळंच दीपाली हिंन मृत्यूला कवाटाळलं असा आरोप करून दोषी असलेल्या शिकुमार यांना फाशीच झाली पाहिजे अशी तीव्र भावना व्यक्त केली.

या प्रसंगी पालकमंत्री यशोमतीताई ठाकुर म्हणाल्या की दीपाली यांची आत्महत्या
हिंघटनाच वेदनादायी आहे.जितक दुःख तुम्हाला झालाय ना तितकंच दुःख आम्हाला झालंय,दीपाली यांचा अशा वेळी जाण्यानं एक धाडसी, कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला आहे. जे दोषी असतील त्यांना माफी नाही.अस त्या यावेळी म्हणाल्या
Previous Post Next Post
MahaClickNews
MahaClickNews