अमरावती, दि. ३ : तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील गॅस सिलेंडर स्फोट दुर्घटनेत घराची हानी झालेल्या कुटूंबाला पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी भेट देऊन दिलासा दिला.
तळेगाव ठाकूर येथील गोमासे कुटुंबाकडे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घराचे नुकसान झाले. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज तळेगावला भेट देऊन या कुटुंबाला भेट दिली. प्र. तहसीलदार उमेश खोडके व अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी या कुटुंबाला पालकमंत्र्यांच्या हस्ते गॅस शेगडी, सिलेंडर व धान्य शिधा देण्यात आला.
त्याचबरोबर, नुकसानाबाबत शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी संबंधित गॅस कंपनीकडे प्रकरण तात्काळ पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती प्र. तहसीलदार श्री. खोडके यांनी दिली.