जिल्हाधिकारी व आयुक्तांकडून एसआरपीएफ स्मशानभूमीची पाहणी

अमरावती, दि. 28 : शहरातील हिंदू स्मशानभूमीवरील अतिरिक्त ताण कमी करण्याच्या उद्देशाने शहरातील विविध भागांतील स्मशानभूमीचा विकास करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी आज वडाळी येथील एसआरपीएफ स्मशानभूमीची पाहणी केली.  

सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा नेताम उपस्थित होते. याठिकाणी नविन ओट्यांचे प्रमाण वाढवावे, अशी सूचना जिल्हाधिका-यांनी यावेळी केली. एकाच भागातील स्मशानभूमीवर ताण येऊ नये यासाठी शहरातील विविध भागातील स्मशानभूमी विकसित करण्यात येत आहेत.  त्यासाठी लागणारे साहित्य, निधी आदी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
Previous Post Next Post
MahaClickNews