कामगारांना सहाय्यासाठी मदत कक्ष

अमरावती, दि. १७ 
 कोरोना प्रतिबंधासाठी लागू संचारबंदीमुळे  जिल्ह्याबाहेरील कामगार बांधवांचे स्थलांतराची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी कामगार उपायुक्त कार्यालयाने मदत, नियंत्रण व तक्रार निवारण कक्ष, भरारी पथक कार्यान्वित करण्यात आल्याचे कामगार उपायुक्त वि. रा. पाणबुडे यांनी कळवले आहे.

कामगार बांधवांना कुठलीही अडचण आल्यास त्यांनी कक्षाशी (०७२१) *२६६ २१ १५* या दूरध्वनी क्रमांकावर किंवा *८६६८४ ९६४१८* या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या मोबाईल क्रमांकावर अडचण किंवा तक्रारीबाबत एसएमएस किंवा व्हाट्सअप संदेशही पाठवता येतील.
Previous Post Next Post
MahaClickNews