महानगरपालिके तर्फे कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती येथे भाजी विक्रेत्‍यांची व कामगारांची कोरोना चाचणी

अमरावती प्रतिनिधी,

कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने अमरावती महानगरपालिकेने उपाययोजनांची तीव्रता वाढवली आहे. शहरातील भाजी विक्रेते, व्यापारी, दुकानदार, हातगाडी धारकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

महानगरपालिका आयुक्‍त प्रशांत रोडे यांच्‍या निर्देशावरुन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासह कोरोना स्प्रेडर शोधण्यासाठी महानगरपालिकेतर्फे मंगळवार दिनांक २० एप्रिल,२०२१ रोजी कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, जुना कॉटन मार्केट येथे ३६९ भाजी विक्रेत्‍यांची कोरोना चाचणी करण्‍यात आली व हा उपक्रम राबविण्‍यात आला. कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीतील २ भाजी विक्रेत्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

उपआयुक्‍त रवि पवार यांनी कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती येथे पाहणी केली असता तेथील व्‍यापारी व कर्मचारी यांना तत्‍काळ कोरोना चाचणी करण्याच्या सूचना यावेळी त्‍यांनी दिल्‍या. ज्‍या व्‍यापा-यांनी व कर्मचा-यांनी कोरोना चाचणी केली नाही त्‍या व्‍यापा-यांचे दुकान सिल होवू शकते अश्‍या सुचना दिल्‍या. तसेच सर्व भाजी विक्रेत्यांना चाचणी करण्‍याच्‍या सुचना यावेळी त्‍यांनी दिल्‍या.

यावेळी सहाय्यक आयुक्‍त नरेंद्र वानखडे, कार्यकारी अभियंता २ सुहास चव्‍हाण, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, उपअभियंता प्रमोद इंगोले, डॉ.संदिप पाटबागे, डॉ.देवेंद्र गुल्‍हाणे, अभियंता दिनेश हंबर्डे, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक विजय बुरे, स्‍वास्‍थ निरीक्षक धनिराम कलोसे, प्रशांत गावनेर, प्रिती दाभाडे, महेश पळसकर, मनिष हडाले, अविनाश फुके, मनिष खंडारे, नितीन भेंडे, विष्‍णू लांडे उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews