एएनएम व जीएनएम धारकांचा कोविड विषयक सेवांसाठी होणार वापर आ. सुलभाताई खोडके यांची आरोग्य उपसंचालकांशी चर्चा

अमरावती  ३० एप्रिल: .  जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे वाढते प्रमाण दिलासादायक आहे . ऑक्सिजन व खाटांच्या मागणीत  किंचित घट  झाली असली तरी कोरोनाचे सद्याचे संकट पाहता जिल्हा कोवीड रुग्णालय व अन्य कोविड सेंटर येथे  ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध  व्हावा , यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारणी हेच लक्ष असून यासाठी सर्व प्रकारची तांत्रिक मदत करण्याबाबत आ. सुलभाताई खोडके यांनी आश्वस्त केले . 
 राज्यासह अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने दीर्घकालीन उपाययोजना करण्याला घेऊन शुक्रवार दिनांक ३० एप्रिल रोजी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या .  या बैठतीला  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके , जिल्हा कोविड रुग्णालयाचे प्रभारी डॉ . रविभूषण , नोडल अधिकारी डॉ . सतीश हुमणे , विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ . कल्पना भागवत , वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल धांदे  , जनसंपर्क अधिकारी सागर दुर्योधन , आदी उपस्थित होते.  
या बैठकीमध्ये प्रामुख्याने ऑक्सिजन बेड वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली .  सुपर स्पेशालिटी कोविड हॉस्पिटल येथे सद्यस्थितीत  ३९० कोरोना बाधित रुग्ण उपचारार्थ दाखल आहे . येथे ३५० बेड हे ऑक्सिजन बेड असून ,  सामान्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना १०० नॉन ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहे . डबल फ्लो ऑक्सिजन पॉईंट ची संख्या ५० आहे.  त्याच प्रमाणे जिल्हा सामान्य रुग्णालय  (इर्विन )  येथे १५ ऑक्सिजन बेड ची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती डॉ .रविभूषण यांनी दिली .यावर आ. सुलभाताई खोडके यांनी ऑक्सिजन बेड वाढविण्याची गरज असल्याचे सांगून यासंदर्भात पीएसए प्लॅन उभारण्यासंदर्भात सूचना केली. दरम्यान जिल्हा कोवीड रुग्णालय येथील मनुष्यबळासंदर्भातील विषयावर चर्चा करण्यात आली असता,  याठिकाणी नर्सिंग , मेडिकल ऑफिसर व अटेंडंटस मिळून  ११० इतके मनुष्यबळ सेवा बजावत असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ . सतीश हुमणे यांनी दिली . जिल्हा कोवीड रुग्णालयात वाढती रुग्णसंख्यालक्षात घेता याठिकाणी प्रगत व प्रशिक्षित असा स्टाफ उपलब्ध करणे गरजेचे असल्याने आ. सुलभाताई खोडके यांनी बैठकीदरम्यान आरोग्य उपसंचालक (अकोला ) राजकुमार चव्हाण यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संवाद साधला . 
नर्सिंग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या कोवीड विषयक  कामांकरिता एएनएम यांच्या सेवेचा लाभ घेतल्यास ही बाब कोवीड काळात तत्पर रुग्णसेवेकरीता उपयुक्त ठरेल , तसेच नोंदणी न झालेल्या जीएनएम धारकांचाही कोवीड विषयक कामात उपयोग करता येईल अशी सूचना आ. सुलभाताई खोडके यांनी केली . यावर आरोग्य उपसंचालक (अकोला ) राजकुमार चव्हाण यांनी सकारात्मकता दर्शवित संबंधितांना दिशानिर्देश देणार असल्याचे सांगितले . कोविड  रुग्णांवर उपचार करण्याकरिता प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने हालचाली सुरु करण्याची सूचना आमदार महोदयांनी डॉ.सतीश हुमणे यांना केली . दरम्यान बैठकीत  रुग्णांच्या सुरक्षे बाबतही खल देण्यात आला . सुपर हॉस्पिटल परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता  पोलीस कर्मचारी तैनात करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली . यावर आमदार महोदयांनी अमरावती शहर पोलीस उपायुक्त  विक्रम साळी यांच्याशी भमणध्वनी वरून चर्चा केली असता , सुपर स्पेशालिटी परिसरात राउंड द क्लॉक प्रमाणे दोन पोलीस कर्मचारी कर्तव्यावर हजर करणार असल्याचे डीसीपी विक्रम साळी यांनी सांगितले . तसेच जिल्ह्यात कोवीड संदर्भातील तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता मुबलक  ऑक्सिजन साठा उपलब्धता , खाटांची संख्या वाढविणे , आदी बाबींसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांशी आपण चर्चा करणार असल्याचे आ. सुलभाताई खोडके यांनी बैठकीत स्पष्ट केले .
Previous Post Next Post
MahaClickNews