अमरावती २७ एप्रिल : महानगरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता तसेच विविध तालुक्यांच्या स्थळी जाण्यासाठी उपयुक्त व पुढे आंतरराज्यीय वाहतूक व दळणवळणासाठी सोयीच्या अशा हॉटेल गौरी ईन ते पंचवटी चौक पर्यंतच्या चौपदरी रस्त्यात नाविन्यपूर्ण अशी सुधारणा होणार आहे . एकूण २.२ किलोमीटर इतक्या लांबीच्या या बहूपर्यायी रस्त्याच्या दुरुस्ती व रस्त्यांच्या बाजूस आवश्यक कामांकरिता अमरावतीच्या आ.सौ .सुलभाताई खोडके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ४.८६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे . याबद्दल आ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे .
अमरावती शहरात पायाभूत रस्ते विकासाबरोबर अपघात विरहित वाहतुकीच्या दृष्टीने आ. सुलभाताई खोडके यांनी पुढाकार घेतल्याने शहरातील मुख्य रस्ते त्याचबरोबर शहरातून जाणारे जिल्हा प्रमुख मार्ग, राज्यमार्ग, महामार्ग आदी मार्गांचा कायापालट होऊन सुरक्षित प्रवास ,वाहतूक व दळणवळणाला चालना मिळत आहे . अशातच अमरावती शहरातील हॉटेल गौरी ईन ते पंचवटी चौकापर्यंत सतत वाहतुकीची वर्दळ सुरु असल्याने या चौपदरी रस्त्यात नावीन्यपूर्ण सुधारणा करणे व रस्त्याच्या बाजूला आवश्यक सुविधांची कामे करणे जरुरीचे झाले आहे. सदर बाब लक्षात घेता आ. सुलभाताई खोडके यांनी हॉटेल गौरी ईन ते पंचवटी चौक पर्यंतच्या चौपदरी रस्त्याच्या सुधारणेकरिता निधी उपलब्ध व्हावा, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदन देऊन सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे .
अमरावती -बडनेरा रस्ता हा एकंदरीत १५. ४ किलोमीटर लांबीचा असून सद्यस्थितीत एकूण लांबीपैकी ६.८ किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. तसेच ६.४ किलोमीटर लांबीचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे . परंतु या पूर्ण लांबीत हॉटेल गौरी ईन ते पंचवटी चौक पर्यंतच्या २.२ किलोमीटर रस्त्याची दुरुस्तीची कामे सुटलेली आहे. त्यामुळे अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावर वाहतुकीची समस्या देखील उद्भवत आहे. मोर्शी ,वरुड, तिवसा या भागातून अमरावतीकडे होणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहतुकीला याच मार्गाचा अवलंब करावा लागत असून याच रस्त्यावर शाळा, महाविद्यालय,हॉस्पिटल, व्यापारी प्रतिष्ठाने असल्याने स्थानिकांची सुद्धा मोठी अवागमन दिसून येते. एकंदरीत परिस्थितीचा विचार केल्यास या रस्त्यावर आवश्यक दुरुस्तीच्या कामांसह नावीन्यपूर्ण सुधारणा करणे जरुरीचे झाले असल्याची बाब आ.सुलभाताई खोडके यांनी मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याची फलश्रुती म्हणून केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत हॉटेल गौरी ईन ते पंचवटी चौक पर्यंत चौपदरी रस्त्याच्या सुधारणे करिता ४. ८६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे .या निधी अंतर्गत रस्ताच्या अस्तित्वातील पृष्ठभागावर बी.एम.ने लेवलिंग कोर्स पूर्ण करण्यात येणार आहे. ६० मिलीमीटर जाडीचा डी.बी.एम चा थर चढविण्यात येणार आहे. तसेच ४० मिली मीटर जाडीचा बिट्टू मिनस काँक्रीटचा थर, दोन्ही बाजूंना कच्ची गटारे, दोन्ही बाजूंना काठीण मुरूमाचे स्कंद, थर्मो प्लास्टिक पेंट, कॅट आईज, रस्त्याच्या दुभाजकाला लोखंडी ग्रील ,दुभाजकामध्ये फुलझाडे आदी नाविन्यपूर्ण सुधारणांची कामे होणार आहे. सदर कामांमुळे हॉटेल गौरी ईन ते पंचवटी चौक मार्गावरून शहरातील इर्विन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक आदी भागात जाण्यासाठी स्थानिक नागरीकांसह शहरवासीयांना चांगली सुविधा होणार असून वाहतुक करणेही सोयीचे ठरणार आहे. राज्यभरात सर्वत्र रस्ते विस्तारीकरांची कामे व काँक्रीट रस्त्याचे जाळे पसरत असतांना आ. सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने अमरावती मधील विविध रस्त्यांना नवी चकाकी येऊन दुभाजकावरीर हिरवळीने शहराच्या सौदर्यीकरणात विशेष भर घातली आहे .