मनपा आयुक्तांनी केली विलास नगर स्मशान भूमीची पाहणी कोरोना व्यक्तींचे अत्यंसंस्कार करताना खबरदारी बाळगावी आयुक्त प्रशांत रोडे

अमरावती, दि. 18 :  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोना आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करतांना जाणीवपूर्वक सर्व खबरदारी बाळगावी. अंत्यसंस्कारच्या ठिकाणी मृत व्यक्तीला आणण्यासाठी स्वतंत्र प्रवेशव्दार व निकास व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सॅनिटायझर, नातेवाईकांना उभे राहण्यासाठी शेड आदीसह कोरोना त्रिसुत्रीचे त्याठिकाणी काटेकोर पालन करावे,  अश्या सूचना आयुक्त यांनी दिल्या

                 रवीवारी (ता.18) जि
आयुक्तांनी विलास नगर स्मशान भूमीला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील व्यवस्थेची व परिसराची पाहणी केली. महापालीका उपआयुक्त रवी पवार, सहाय्यक आयुक्त योगेश पिठे यावेळी उपस्थित होते.

                 श्री. रोडे म्हणाले की,  कोरोनाबाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच संक्रमितांची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाव्दारे अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत राज्यात तसेच जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विविध प्रतिबंधात्मक आदेश  लागू करण्यात आले आहे. या आदेशांचे नागरिकांनी उल्लंघन करु नये. आपला तसेच आपल्या कुटुंबियांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे.
                 अमरावती शहरातील  मृतक व्यक्तींवर त्या त्या भागातील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन करणे सुरू करण्यात आले आहे. आताची परिस्थिती पाहता कोरोनाने मृत पावलेल्या रुग्णांवरही हिंदू स्मशान भुमीतच गॅस दाहीनीच्या माध्यमातून अंत्यसंस्काराची सुविधा केली आहे. आता इतर स्मशानभूमीत ही कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीची अंत्यसंस्काराची सुविधा करण्यात आली आहे. पण हा विधी करत असतांना मृतकाच्या नातेवाईकांसह संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना संक्रमण होणार नाही, याची कटाक्षाने खबरदारी बाळगावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे सर्व उपाययोजना त्याठिकाणी तयार ठेवावी. मोजक्याच नातेवाईकांना प्रवेश द्यावा, असे निर्देश त्यांनी पाहणी प्रसंगी दिले.
Previous Post Next Post
MahaClickNews
MahaClickNews