गोकुळ आश्रमचा उपक्रम पोलिसांना ऑक्सिजन पोटली चे वाटप

अमरावती 
अमरावती दिवसरात्र आपल्या जीवाची बाजी लावून गस्त घालणाऱ्या पोलीस बांधवांना अमरावती च्या गोकुळ अनाथ आश्रमच्या चिमुकल्यांनी व संचालक गुंजनताई गोळे यांनी बनवलेल्या ऑक्सिजन पोटलीचे वाटपाची सुरुवात शहरातील गाडगे नगर पोलीसस्टेशन पासून  केली तसेच चौकाचौकात आपली ड्युटी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पण वाटप करण्यात आले.. भीमसेन कपूर, ओवा, लवंग व निलगिरी तेल याची मिश्रण करून ही ऑक्सिजन पोटली बनविण्यात आली आहे..  दिवसभर जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस तसेच सफाई कामगार कार्यकरीत असून त्यांच्या आरोग्याचा विचार आपणही करायला हवा या हेतूने हा उपक्रम गोकुळ आश्रम तसेच सावली बचतगट च्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. जवळपास 1000 पेक्षा जास्त पोटलीचे वाटप करण्यात येणार असून याकरिता छाया ताई गिरोळकर, माजी नगरसेविका स्वाती ताई निस्ताने, वर्षाताई भोयर, सविताताई गोळे  यांचे सहकार्य लाभले आहे अशी गोकुळ च्या संचालिका गुंजनताई गोळे यांनी माहिती दिली..
Previous Post Next Post
MahaClickNews