अमरावती प्रतिनिधी
समाजातील कित्येक घर आज या पावटीमुळे अंधारात आहे. पावटी म्हणजे दारू..!!.ग्रामीण भाषेत तिलाच पावटी म्हणतात.तिच्या मोहापायी कित्येक संसार मोडले गेले.कितीतरी मुले आज निराधार झाली आहेत . घरादाराची राखरांगोळी झाली होते ती या पावटी मुळे ! हे सामाजिक चित्र शहरात व ग्रामीण भागात आपण नेहमीच बघत आलो. छोट्याशा पावटी मुळे किती मोठं मोठे अनर्थ घडतात हे आपण रोजच्या दैनंदिन जीवनात बघतोच , अश्याच ऐका वास्तविक व हृदयस्पर्शी कथेवर आधारित लेखक दिग्दर्शक सागर भोगे यांचा पावटी नावाचा मराठी लघुपट लवकरच येणार आहे. कलानगरी वेलफेअर सोसायटी निर्मित, व स्माईल स्नॅप प्रस्तुत वेसन मुक्ती व सामाजिक पावटी मराठी लघुपटाचे दिग्दर्शक सागर भोगे. असून निर्माता. अक्षय खल्लारकर.आहेत. तसेच
पावटी लघुपटाचे कलाकार संकलन. भारत वानखडे. श्रुतिका गावंडे. सोनाली सरदार . प्रफुल्ल कोटेकर . ओम सावळे . सुधीर पडसे. सुमित जगताप. भूषण जोंधळे. विशाल वानखडे . वंदना थोरात. साक्षी थोरात. सह दिग्दर्शक आशिष सुंदरकर.व सह छायांकन अमोल कोयकार . सुजल दामोदर सुशांत सरोदे. आहेत .
तरी सर्वानी हा लघुपट आवर्जून पहावा असे आवाहन या चित्रपटाचे दिग्दर्शक सागर भोगे यांनी केले आहे