राष्ट्रीय गौरव पुरस्काराने उत्तमराव गवई सन्मानीत
अमरावती : महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समितीचे अध्यक्ष ,खोरीपाचे राष्ट्रीय संघटक तथा कामगार नेते उत्तमराव गवई यांच्या एकदंर चळवळीतील योगदानाबद्दल इंडियन इंन्टर नँशनल फ्रेडशिप सोसायटी नवी दिल्ली तर्फे विशिष्ट संमारंभात सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. उत्तमराव गवई हे आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते असून दलित पँथर,रिपब्लिकन पार्टी ,खोरीपा तसेच गेल्या ५० वर्षापासून सामाजिक कार्यासाठी,कामगाराच्या व कोतवाल्यांच्या प्रश्नाकरीता मोर्चे ,निदर्शने,आंदोलने,उपोषण,बैठ्ठा सत्याग्रहाचे नेतृत्व करून न्याय मिळवून दिला आहे.या आधी या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांचा *दलितमित्र* पुरस्कार देवून सन्मान केला आहे.या सर्व बाबीचा विचार करून *इंडियन इंन्टरनँशनल फ्रेन्डशिप सोसायटीने सदर पुरस्कारासाठी निवड केली असून या आधी हा पुरस्कार गव्हर्णर,न्यायधिश,एअरचिप मार्शल,विविध राज्यातील मुख्यमंत्री,खासदार,आमदार, सामाजिक नेते यांना पुरस्कार देवून सन्मान केला आहे.नवी दिल्ली येथे इंडियन इंन्टरनँशनल फ्रेडशिप सोसायटी सभागृह मा.खासदार डॉ.शशिकला पुप्षारामास्वामी , मा.श्री.भिक्कूरामजी इदाते राज्यमंत्री,मा.गुरूप्रितसिंग यांच्या हस्ते उत्तमराव गवई यांना राष्ट्रीय पुरस्कार देवून गौरवविण्यात आले.त्याबद्द्ल श्री.उपेन्द्र शेंडे रा.अध्यक्ष खोरीपा,प्राचार्य गोपीचंद मेश्राम सरचिटणीस,प्राध्यापक ढोके,देशक खोब्रागडे,रमेशचंद्र कांबळे,भाऊ निरभवने,जीवन बागडे,अँड दीलीप घरडे,चरणदास नंदागवळी,नामदेव दंडाळे,भिमराव शेंडे,बंडू वानखडे,नामदेव शिंदे,सुनिल सोनावणे,इरान्ना कांबळे,योगेश बाबर,शिवाजीराव पवार,संजय सांळूके,तसेच आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. -