सातुर्णा, दस्तुरनगरात मंगळवारी पाणी नाही

अमरावती, दि. ३१ : शहराच्या पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी दस्तुरनगर चौकातील खोदकामामुळे फुटल्याने काही भागातील पुरवठा उद्या (१ जून) बंद राहणार आहे.

शहरात उद्या सातुर्णा, दस्तुरनगर, साईनगर, बडनेरा भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कळवली आहे. 
Previous Post Next Post
MahaClickNews