पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध समाजपयोगी उपक्रम साजरे तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे वितरण

अमरावती, दि. १७: जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा वाढदिवस त्यांच्या सांगण्यानुसार अत्यंत साधेपणाने रुग्णसेवा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. तिवसा व मोर्शी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे मंत्री ॲड. ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्ह्यात विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आले.

                 मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तिवसा तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तालुक्यातील तळेगाव ठाकूर, कुऱ्हा, मार्डी येथील ग्रामीण रुग्णालय व अन्य आरोग्य केंद्रांना पाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर, सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलला दहा ऑक्सिजन कॉन्सट्रेटर तर जिल्हा सामान्य रुग्णालयास ऑक्सिजन कॉन्सट्रेटर, बेडस्, पीपीई किट व मास्क आदी साहित्यांचे वितरण करण्यात आले.

मोर्शी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तालुक्यातील नेरपिंगळाई, विचोरी, वलगाव, शिराळा, माऊली जहागीर, खोलापूर, आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णांना तातडीने ऑक्सिजन मिळावे, या हेतूने ऑक्सिजन कॉन्सट्रेटर वितरीत करण्यात आले.

तिवसा शहर काँग्रेस व यशोमतीताई ठाकूर मित्र मंडळाव्दारे पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त तिवसा ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन कॉन्सट्रेटर वितरीत करण्यात आले. यासोबतच मतदारसंघातील सर्वच शासकीय रुग्णालय, उपकेंद्रांमध्ये अत्यावश्यक असलेले ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यशोमतीताई ठाकूर मित्र मंडळाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा बघता आणि तिवसा येथील कोव्हीड रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

या उपक्रम अंतर्गत तिवसा येथील विनोद पटेल यांनी पटेल परिवार तर्फे सुद्धा मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त एक कॉन्सट्रेटर उपलब्ध करुन दिले.

नांदगाव पेठ व तळेगाव दशासर येथे पालकमंत्र्यांच्या आईची आणि पालकमंत्री यांची रक्ततुला करण्यात आली. वलगाव येथील वृध्दाश्रमात निराधारांना साडी-चोळी, नववारी पातळ, दुपट्टे व फळांचे वाटप करण्यात आले. नांदुरा येथे मास्क व सॅनिटायझर वितरण करण्यात आले. तिवसा येथे स्व. जानरावजी सातपुते यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच यशोमती ताईंच्या वाढदिवासानिमित्त जनावरांसाठी पिण्याचे पाण्याचे हौद वितरण करण्यात आले. ताईंच्या वाढदिवसानिमित्त तिवसा तालुक्यातील सर्व शिवभोजन केंद्रातून गोरगरीबांना आमरसचे वाटप करण्यात आले.

तिवसा ग्रामीण रुग्णालयात कॉन्सट्रेटर वितरण उपक्रम हा कार्यक्रम यशोमती ठाकूर यांच्या सुकन्या आकांक्षा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत  तालुका आरोग्य अधिकारी जोत्सना पोटपिटे, डॉ रोशन बोके,डॉ गौरव विधळे,  नगराध्यक्ष वैभव वानखडे, माजी जि प सभापती दिलीप काळबांडे, डॉ आदित्य भैय्या,अतुल वै देशमुख ,गजानन काळे, ओ एस डी प्रमोद कापडे, विनोद पटेल किशोर गवळी, योगेश वानखडे, अनिकेत देशमुख,डॉ वैभव अंधारे, सचिन गोरे, परिचारिका सोनल ठाकूर, अजीम शहा, शिवा तिखाडे,  रुग्णसेवक वैभव बोकडे, बंडू कदम, अंकुश देशमुख,  सागर खांडेकर, उमेश राऊत, किसन मुंदाणे, प्रसाद लाजुरकर, संजय चौधरी, आशिष खाकसे, यदनेश तिजारे, अनिकेत प्रधान ,आनंद शर्मा , अतुल वानखडे ए एन एम  प्रतिभा शेंडे, नीलिमा जवंजाळ, पूनम गजभिये, सुरेखा वानखडे, शारदा लोखंडे आदींच्या उपस्थित पार पडला.
Previous Post Next Post
MahaClickNews