संजय खर्चे व योगेश शर्मा यांनी फोटोग्राफर मित्रांना लसीकरणाच दोन्ही डोस खाजगी रित्या दिले

मलकापूर : - समस्त फोटोग्राफर बांधवांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरातील जेष्ठ फोटोग्राफर मदन केला यांच्या मार्गदर्शनाखाली फोटाग्राफर संजय खर्चे व योगेश शर्मा यांनी स्वखर्चातून फोटाग्राफर बांधवांच्या प्रथम व दुसऱ्या टप्यातील लसीकरणाचा खाजगी रित्या आर्थिक भार उचलित सामाजिक भान जपले आहे . मागील वर्षाप्रमाणे या वर्षीसुध्दा लग्न सोहळयावर कोरोनाचे सावट कायम आहे . परिणमातः अनेक लग्न सोहळयांना तात्पुरती स्थगिती दिल्या जात आहे . निबंधामुळे नियम व अटीची पूर्तता करुन मोजकेच विवाह सोहळे पार पडत आहे . अशा छोटेखानी समारभात त्या आठवणी जपल्या जाव्या म्हणून फोटोग्राफर बांधवाना आर्डरी मिळतात . मिळालेल्या ऑर्डरीनुसार उदरनिर्वाहाकरिता फोटोग्राफर बांधवाना कोरोना संदर्भातील नियम पाळून काम करावे लागते . पुर्वी व आता मिळणारा रोजगार यात मोठया प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे . आर्थिक उत्पन्नावर निबंध आले आहेत . त्यामुळे उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे . त्यातच फोटोग्राफर बांधवानी महागडे कॅमेरे , लेन्स , लाईट आदी साहित्य कर्ज काढून आणले आहे . दुकाने बंद असल्याने दुकान भाडे व कामावरिल मजुरांना महिना तसेच बँकांकडून काढलेले कर्ज हे देणे घेणे करणे अवघड झाले आहे . अशा परिस्थीतीतह शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देवून जेष्ठ फोटोग्राफर मदन केला यांच्या मार्गदर्शनाखाली फोटोग्राफर संजय खर्चे व योगेश शर्मा यांनी स्वत : हाच्या खिशाल झळ पोहोचवित समस्त फोटोग्राफर बांधवांचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण करुन घेतले . या लसीकरण्याच्या कार्यात डॉ.रिया चोपडे यांचे विशेष सहकार्य लाभले . तर कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता बाळू सातव , अनिल ठाकूर , दिनेश भागवाणी , पवन खर्चे , विनोद चौधरी , भिकाजी चिमकर , मुकेश सुरपाटणे , शामसुंदर वराडे पुरषोतम रायपुरे  गणेश नाफडे धनंजय काटले गुणवंत गलवाडे   यांनी परिश्रम घेतले .
Previous Post Next Post
MahaClickNews