लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ करिता स्कूल ऑफ स्कॉलर्स द्वारे झूम मिटींग आभासी पद्धतीने ‘संस्कृती कलादर्पण - भारतातील पहिले सर्वात मोठे कला प्रदर्शनी २०२१’ संपन्न

अमरावती शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स ही एक नामांकित शाळा असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव  विविध  उपक्रमांचे आयोजन शाळेतर्फे केले जाते.  यापूर्वी देखील शाळेने लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड,  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अशा प्रकारचे विविध  रेकॉर्ड तयार करून नावलौकिक  मिळविला आहे.  आपल्या यशाची परंपरा कायम राखत सध्याच्या अपर्याप्त अवस्थेत देखील विद्यार्थ्यांच्या  कलागुणांचा विचार करून  शाळेच्या  चित्रकला विभागातर्फे ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’करिता झूम मिटींग द्वारे आभासी पद्धतीने ‘संस्कृती कलादर्पण -  भारतातील पहिले सर्वात मोठे आभासी कला प्रदर्शनी २०२१’ आयोजन करण्यात आले.
या प्रदर्शनीमध्ये  सध्याच्या  महामारी च्या काळात वर्षभरामध्ये शाळेतर्फे आयोजित दैनंदिन वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यां द्वारे तयार करण्यात आलेल्या एकूण २०२१  चित्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचा समावेश करण्यात आला. या आभासी प्रदर्शनीचे आयोजन दि. ४ मे २०२१ रोजी संध्या. ६ वा. झूम मिटींग द्वारे करण्यात आले. या प्रदर्शनी करिता पाहुणे म्हणून श्री. आशिष देशमुख (मुख्याध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, अमरावती व लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड प्राप्त शिक्षक), सौ.  अंजली उंटवाले (चित्रकार) हे असून प्रदर्शनीचे परीक्षक म्ह्णून श्री. धनंजय डबले, (विभाग प्रमुख, चित्रकला विभाग, स्कूल ऑफ स्कॉलर्स नागपूर), श्री. रवींद्र दिवटे (चित्रकला शिक्षक, स्कूल ऑफ स्कॉलर्स अकोला तथा आंतरराष्ट्रीय चित्रकार) यांची उपस्थिती लाभली. 
या प्रदर्शनी च्या आयोजनाचा मुख्य हेतू म्हणजे अशी कोणतीच परिस्थिती नाही जी विद्यार्थ्यांना शिकण्यापासून थांबवू शकेल, त्यांच्या प्रदर्शना पासून थांबवू शकेल हा संदेश समाजापर्यंत पोहचवणे हा आहे. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्ना दुबे, गौरी बेहरे, आर्या पत्की, व तन्वी राठोड यांनी केले. तसेच तांत्रिक कार्यभार जितेंद्र बुटे व स्वाती डांगे यांनी सांभाळला. 
या प्रदर्शनी करिता पाहुणे व परीक्षक म्हणून लाभलेले श्री. आशिष देशमुख, सौ.  अंजली उंतावळे, श्री. धनंजय डबले, श्री. रवींद्र दिवटे  या सर्वानी विद्यार्थाना मार्गदर्शन केले तसेच अशाप्रकारचे प्रदर्शन हि एक आगळीवेगळी कल्पना असून त्याचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार होणे हे खरेच कौतुकास्पद गोष्ट असल्याचे नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्याकरिता प्रमुख पाहुण्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लकडे यांनी देखील विद्यार्थ्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.
या प्रदर्शनी करिता शाळेचे मुख्याध्यापक सुरेश लकडे, उपमुख्याध्यापिका सौ. समिधा नाहर, तसेच प्रशासकीय अधिकारी निलय वासाडे यांचे विशेष सहकार्य लाभले असून प्रदर्शनीच्या यशस्वीतेकरिता चित्रकला विभागप्रमुख कुनाल राजनेकर तसेच चित्रकला संघातील विदयार्थी ध्रुव झा, अथर्व कुलकर्णी, श्रेयांश सावळे, प्रद्युम्न कुलकर्णी, सई  कडू, गौरी बेहरे, आर्या पत्की, तन्वी राठोड या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
Previous Post Next Post
MahaClickNews