गरीब कोरोना रुग्णांना मोफत व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सुविधा देण्यास पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन "सम अनुभूती सेवा केंद्र

गरीब कोरोना रुग्णांना  मोफत व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सुविधा देण्यास पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन "सम अनुभूती सेवा केंद्र "  शुभारंभ..

आक्का फाऊंडेशनचा व संकल्प फाऊंडेशनचा पुढाकार


अमरावती, ता. २६ :  नेमानी इन मंगल कार्यालयात स्थापित झालेल्या अमरावती कोविड सेंटर मध्ये गरीबांना  व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन मोफत पुरवठा करण्याच्या सेवेचा उद्घाटन साेहळा उद्या गुरुवारी 27 मे रोजी सायंकाळी 5 वाजता  संपन्न हात आहे. 

माननीय नितीनजी गडकरी यांनी आक्का फाउंडेशन व संकल्प प्रतिष्ठान च्या माध्यमातून गरीब रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजन ची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर येथे बहुमूल्य लाखो रुपयांची वैद्यकीय उपकरणे संस्थेला दिली आहेत.

या उपकरणांचा उपयोग करून गरिबांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजन सुविधा मोफत पुरविण्यासाठी आक्का फाउंडेशन व संकल्प फाउंडेशनने यासाठी पुढाकार घेतला आहे. 

या सेवा केंद्राला पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन 
"सम अनुभूती सेवा केंद्र" सेवा केंद्र असे नाव देण्यात आले आहे

या "सम अनुभूती सेवा केंद्र"  सेवा केंद्राचे लोकार्पण  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  अमरावती महानगर संघचालक सुनील सरोदे राहतील. तर उद्घाटक म्हणून नागपूर नागरिक बँकेचे अध्यक्ष श्री संजय भेंडे, एम एस एम ई विभागाचे OSD श्री दीप वर्मा , प्रमुख अतिथी तिवसा तालुका संघचालक श्री विजय डहाके असतील तर या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती श्री रोहित कलोती, श्री हिमांशू वेद यांची लाभणार आहे.

 गरीब कोरोना रुग्णांना ही सुविधा नेफरोलॉजिस्ट व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.अविनाश चौधरी यांच्या निगराणीखाली देण्यात येईल.

या कार्यक्रमाचे सातपुडा युथ फाउंडेशन अमरावती च्या फेसबुक पेज वरून  फेसबुक लाईव्ह करण्यात येणार आहे नागरिकांनी या कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी व्हावे असे आव्हान डॉ अविनाश चौधरी, श्री दिनेश सूर्यवंशी, अमरावती कोविड सेंटर चे डॉ.फजल अन्सारी, डॉ.अविनाश भडागे , डॉ.विकी पिंजानी , डॉ.स्नेहा पिंजानी,डॉ.विमी जैन व आरोग्य कर्मचारी तसेच अनिल कुंडलवाल , विजय मेंढे , मुकेश कठाळे , सोपान गुडधे, शिवानंद पाटील,विकास देशमुख,आकाश आडे ,प्रसाद भुगुल ,  धनंजय ओलीवकर , श्याम गवळी ,प्रवीण रुद्रकार,संकेत भुगुल, अतुल कठाळे,अभय सूर्यवंशी, कैफ खान यांनी केले आहे..
Previous Post Next Post
MahaClickNews