२० मे २०२१ लसिकरणाबाबत माहिती कुठल्या केंद्रात मिळनार लस

अमरावती प्रतिनिधी,
महानगरपालिका  अमरावती कार्यक्षेत्रातील ज्या  नागरिकांचा कोविड १९
अंतर्गत  को-व्हॅक्सिन या लसीचा पहिला डोज घेवून २८ दिवस पुर्ण झाले असेल
त्यांचा दुसरा डोज घ्यावयाचा राहीलेला आहे अशा नागरिकांनी खालील लसिकरण
केंद्रावर जावून को-व्हॅक्सिन या लसीचा दुसरा डोज घ्यावा. खाली नमुद
लसिकरण केद्रांवरुन फक्त  को-व्हॅक्सिन लसीचा दुसरा डोज सकाळी ९ ते ५ या
वेळांमध्ये  देण्यात येणार आहे. उपलब्ध  लसीच्या प्रमाणात वाटण्यात येईल.
टोकन वाटप सकाळी ८.३० वाजता करण्या‍त येणार आहे. आयसोलेशन दवाखाना, दसरा
मैदान येथील केद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठी आणि ७० वर्षावरील
व्यक्तींसाठी ५० डोज राखीव ठेवण्यात आले आहे. को-व्हॅक्सिनचा दुसरा डोज
खालील केंद्रावर उपलब्ध आहे.
१) मनपा दवाखाना मोदी हॉस्पिटल बडनेरा, २) आयसोलेशन दवाखाना  ३) दंत
महाविद्यालय, ४) डॉ.पंजाबराव देशमुख महाविद्यालय, ५) हरीभाऊ वाट दवाखाना,
जुनीवस्ती, बडनेरा
महानगरपालिका  अमरावती कार्यक्षेत्रातील ४५ वर्ष व त्यापेक्षा  जास्त
वयोगटाकरीता ज्या नागरिकांचा कोविड १९ अंतर्गत कोविशिल्ड‍ या लसीचा पहिला
डोज घ्या‍वयाचा राहीलेला आहे अशा नागरिकांनी खालील लसिकरण केंद्रावर
जावून कोविशिल्ड या लसीचा पहिला डोज घ्यावा. खाली नमुद लसिकरण
केद्रांवरुन कोविशिल्ड लसीचा पहिला डोज सकाळी ९ ते ५ या वेळांमध्ये
देण्यात येणार आहे. ७० टक्के ऑनलाईन पध्दतीने तर ३० टक्के  टोकन पध्दतीने
नोंदणी करण्यात येणार आहे. ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांनी लस
घेण्यासाठी शासकीय निर्देशानुसार https://selfregistration.cowin.gov.in
या कोविन पोर्टलवर रितसर नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी
केलेल्या ४५ वर्षावरील  वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे यांची
नोंद घ्यावयाची आहे. ही नोंदणी झाल्यानंतर पोर्टलवर आपल्या सोयीचे लसीकरण
केंद्र निवडून त्याठिकाणी दिनांक निवडून आपली अपॉईंटमेंट आरक्षीत
करावयाची आहे आणि त्या वेळेला, त्या केंद्रावर जाऊन लस घ्यावयाची आहे.
सदर नोंदणी व अपॉईंमेंट बुकींग प्रक्रिया पूर्ण करूनच लसीकरण केंद्रावर
जायचे असून लसीकरणासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करून आलेल्या कोणत्याही
व्यक्तींची गैरसोय होणार नाही याची काळजी महानगरपालिकेमार्फत घेतली जात
आहे. २० मे साठी ऑनलाईन नोंदणी  सकाळी ७.०० वाजता तर टोकन पध्दत ८.३०
वाजता सुरू होणार आहे. उपलब्ध   लसीच्या  प्रमाणात वाटण्यात येईल.
कोविशिल्ड या लसीचा पहिला डोज खालील केद्रांवर उप‍लब्ध आहे.
१) मनपा दवाखाना भाजीबाजार, २) यंग मुस्लिम सो.असो. नागपुरी गेट, ३) मनपा
दवाखाना मसानगंज, ४) शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी, ५) दंत
महाविद्यालय,  ६) शहरी आरोग्य  केंद्र दस्तुरनगर, ७) डॉ.पंजाबराव देशमुख
महाविद्यालय, ८) आयसोलेशन दवाखाना.

वैद्यकीय आरोग्यन अधिकारी
महानगरपालिका, अमरावती
Previous Post Next Post
MahaClickNews