महसूल कर्मचारी एकता संघातर्फे मंगळवारी प्लाझ्मा व रक्तदान शिबिर

अमरावती, दि. ३ : अमरावती जिल्हा महसूल कर्मचारी एकता संघातर्फे उद्या मंगळवारी (४ मे) सकाळी १० वाजता येथील नियोजनभवनाच्या सभागृहात प्लाझ्मा व रक्तदान शिबिर आयोजिण्यात आले आहे. या शिबिराला दात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन संघाचे कार्याध्यक्ष विजय सांगळे यांनी केले आहे.  

कोविडकाळात उपचारादरम्यान रक्ताची पुरेशी उपलब्धता असावी, गरजूंना प्लाझ्मा उपलब्ध व्हावा यासाठी विविध संस्था-संघटना पुढे येत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महसूल कर्मचारी एकता संघातर्फे शिबिर आयोजिण्यात आले आहे.  प्लाझ्मा उपलब्धतेसाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न होत आहेत. याच पार्श्वभूमीवर संघाने पुढाकार घेत हे शिबिर आयोजित केले आहे, अशी माहिती संघाचे सचिव गजानन उगले यांनी दिली. गतवर्षीही कोविडकाळ लक्षात घेऊन याप्रकारचे शिबिर आयोजित केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आताही गरजूंना प्लाझ्मा व रक्त उपलब्ध करुन देण्यासाठी दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews