खासगी कोविड रुग्णालयांचे ऑडिट करण्यासाठी लेखाधिका-यांचे पथक_जिल्हाधिकारी शैलेश नवाल

खासगी कोविड रुग्णालयांचे ऑडिट करण्यासाठी लेखाधिका-यांचे पथक
दर तीन रुग्णालयांमागे एक लेखाधिकारी नियुक्त

- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. २५ : कोरोना व म्युकरमायकोसिस उपचार सुविधांच्या दर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून निश्चित दर यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहेत. गरजूंकडून रुग्णालयांनी अवाजवी दर आकारू नयेत म्हणून खासगी रुग्णालयातील देयकांचे ऑडिट करण्यासाठी तीन रुग्णालयांमागे एक लेखाधिकारी नेमण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

       _कोविड साथीच्या काळात गरजू रुग्णांची आर्थिक पिळवणूक होऊ नये व कुठेही काळा बाजार, अपप्रकार घडू नये यासाठी प्रभावी देखरेख व कठोर तपासणीचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी वेळोवेळी दिले. त्यानुसार तपासणी पथकेही नेमण्यात आली. आता साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-1897 अन्वये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून खासगी रुग्णालयातील देयकांचे ऑडिट करण्यात येणार आहे._

            यासाठी उपजिल्हाधिकारी राम लंके यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी 17 लेखाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवले कोविड सेंटर, एक्झॉन हॉस्पिटल, बख्तार हॉस्पिटलची जबाबदारी लेखाधिकारी नितीन मेश्राम, बारब्दे हॉस्पिटल, बेस्ट हॉस्पिटल व सिटी हॉस्पिटलची जबाबदारी सहायक लेखाधिकारी जयश्री कोंडे, दामोदर कोविड रुग्णालय, दयासागर व दुर्वांकर रुग्णालयाची जबाबदारी लेखाधिकारी बी. डी. क-हाड,  तर गेटलाईफ रुग्णालय, गोडे हॉस्पिटल, किटकुले रुग्णालयाची जबाबदारी लेखाधिकारी सुनील पाराशर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

            लाईफ केअर रुग्णालय, महावीर हॉस्पिटल, नेमाणी इन कोविड हॉस्पिटलसाठी सहायक लेखाधिकारी एस. बी. शहा, तर ऑर्किड हॉस्पिटल, पारश्री हॉस्पिटल व पारिजात रुग्णालयासाठी सतीश वाघ, पाटणकर रुग्णालय, रीम्स रुग्णालय व साई कोविड हॉस्पिटलसाठी एस. डी. पटोरकर, श्रीपाद कोविड हॉस्पिटल, सनशाईन हॉस्पिटल, तुळजाई कोविड सेंटर यासाठी सहायक लेखाधिकारी क्रांती गावंडे, यादगिरे हॉस्पिटल, झेनिथ हॉस्पिटलसाठी सहायक लेखाधिकारी उमेश लामकाने, चौधरी कोविड हॉस्पिटल, गुरुकृपा रुग्णालयासाठी अमित रामेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            अचलपूर येथील भामकर हॉस्पिटलसाठी लेखाधिकारी म्हणून नगरपालिकेचे लेखाधिकारी संदीप साळवे, तर दर्यापूरच्या एकता हॉस्पिटलसाठी संजय सिन्हा काम पाहतील. नांदगाव खंडेश्वरच्या न्यू लाईफ रुग्णालयासाठी सहायक लेखाधिकारी लक्ष्मण राठोड व वरुडच्या वरुड कोविड हॉस्पिटलसाठी संजय खासबागे जबाबदारी सांभाळतील. धामणगाव रेल्वेच्या येंडे हॉस्पिटलच्या ऑडिटची जबाबदारी लेखाधिकारी अमोल गोफण, चांदूर बाजारच्या आरोग्यम हॉस्पिटलची जबाबदारी सहायक लेखाधिकारी मनीष गिरी व अंजनगाव सुर्जीच्या मातृछाया रुग्णालयाची जबाबदारी सहायक लेखाधिकारी सदानंद जांत्रळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews