ग्रामीण भागात चाचण्या वाढवा-ना.ॲड. यशोमती ठाकूर

कोविड-19 आढावा बैठकअकोला, दि.3  ग्रामीण भागात पावसाळ्यात पेरणीच्या कामानिमित्त शेतीकामाची लगबग वाढेल,अशा परिस्थितीत कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील कोविड चाचण्याचे प्रमाण वाढवाव्या, कोरोना रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन उपचार सुविधा पुरवाव्या, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात कोविड-19  संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ना.ऍड. ठाकूर बोलत होत्या. यावेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, वैद्यकीय महाविद्यालयाचे उपधिष्ठाता डॉ.घोरपडे, डॉ.सिरसाम, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, माजी आमदार बबनराव चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या आशा मिरगे आदि उपस्थित होते.

यावेळी ॲड. यशोमती ठाकूर यांनी कोरोना रुग्ण स्थिती,  रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोईसुविधा याबाबत माहिती घेतली. जिल्ह्यातील कोविड रुग्णाची संख्या वाढत असून वाढत्या रुग्णाकरीता बेड तसेच ऑक्सीजन व व्हेटीलेटर बेडची संख्या वाढवावी,असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी आरोग्य विभागाला दिले. जिल्ह्यातील ऑक्सीजन उपल्बधता, आवश्यक मागणी याबाबत माहिती सादर करण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता जिल्ह्यात पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध होईल, असे नियोजन करावे, अशा सूचना संबंधिताना दिल्यात. तिसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढण्याचे शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात शेतीच्या पुढील हंगामात कोरोना फैलाव रोखण्यासाठी आताच प्रशासनातील तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, कोतवाल या यंत्रणेच्या सहाय्याने सज्ज रहावे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधीनी सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी यावेळी  केले. औषधी, ऑक्सिजनचा काळाबाजार करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिस यंत्रणेस दिले.
Previous Post Next Post
MahaClickNews