महाराष्ट्रातील पोलीस , आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबातील युवक ,युवतींना कोरोना लस देण्यासाठी प्राधान्य द्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्याचे सरचिटणीस - गजानन रेवाळकर

अमरावती
महाराष्ट्रातील पोलीस व आरोग्य विभागांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी  व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील 18 वर्षा वरील युवक युवतींना कोरोना लस देण्यामध्ये प्रथम प्राधान्य द्यावे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्याचे सरचिटणीस गजानन रेवाळकर यांची महाराष्ट्र सरकारला मागणी   देशामध्ये सरकारने असा निर्णय घेतला आहे की 18 ते 44, वयोगटातील व्यक्तींना 1 मे पासून कोरोना लसीकरण  देणे चालू झालेले आहे. परंतु पोलीस अधिकारी आरोग्य विभागातील कर्मचारी हे अहोरात्र ड्युटी करून रोड वर, तसेच हॉस्पिटल मध्ये काम करत आहेत.या कोरोना महामारीमध्ये  महाराष्ट्र पोलीस दलातील तसेच आरोग्य विभागातील बरेच कोरोना योद्धा बांधव मृत्युमुखी पडलेले आहेत.त्यांना  अनेक संघटना, नातेवाईक श्रद्धांजल्या वाहत वाहत त्यांच्या डोळ्यातील पाणी आटून गेलेल आहे. कधी कोणाला कोरोना प्रार्दुभाव होईल याची गॅरंटी नाही. पोलिस व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांना कोरोना प्रादुर्भावाचा जास्त धोका आहे. अति रिस्क मध्ये यांचे  कुटुंबीय वावरत आहेत.. तरी,पोलिसांच्या व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या  मुलांना प्राधान्याने कोरोना लसीकरण होणेबाबत प्राधान्याने त्वरित निर्णय व्हावा . कालच एका पोलिस अधिकारी  आपल्या 18 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील दोन मुलांना घेऊन जुहू मुंबई येथील कूपर रुग्णालयात गेली असता  येथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्या महिला पोलिस अधिकाऱ्याला जुमानले नाही. म्हटले की रजिस्ट्रेशन कोटा पुरा झालेला आहे, तुम्हाला वरून कोणाचा तरी फोन आणावा लागेल म्हणून सांगितले परंतु वरून कोणाचा फोन आणला पाहिजे त्यांनी त्यावर म्हटले की त्यांचे नाव सांगा त्यावर त्या  वैद्यकीय अधिकारी यांनी  कोणाचा नंबर नाव देण्यास नकार दिला. त्या स्वतः सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून मुंबई मध्ये काम करत असताना युनिफॉर्म वर त्यांनी त्यांच्या दोन मुलांना घेऊन नोंदणी करून वॅक्सीन  देण्यासाठी  गेल्या असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी काहीही ऐकून न घेता दाद दिली नाही. त्या महिला पोलिस अधिकारी त्यांच्या मुलांना वॅक्सीन न देता नाराज होऊन घरी परत घेऊन आल्या. त्यावेळी त्यांच्या मुलांचे चेहरे केविलवाणे झाले होते. अशा प्रकारचा अपमान जर या कोरोना योद्ध्यांचा होत असेल तर समोर जाऊन कोणते पोलीस कर्मचारी किंवा आरोग्याचे कर्मचारी काम करतील..? कारण  Lockdown मध्ये घरी बसून आराम करणारी लोक लसीकरण घेऊन तंदुरुस्त होत आहे. आणि फ्रंट वॉरियर यांची मुलं लसीकरणापासून वंचित झालेलीआहे,आतापर्यंत प्राप्त  माहिती  नुसार आठ ते दहा दिवसा पर्यंतची नोंदणी कोटा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुरा झालेला आहे.एक तर मी समोर जाऊन नोकरी करावी किंवा परिवाराचा सांभाळ करावा. त्यांची सुरक्षा कशी करावी. हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे त्यांच्या मुलांना काय सुरक्षा आहे? आणि आठ ते दहा दिवसांमध्ये कोरोना सुरक्षिततेची काय गॅरंटी मिळू शकते?.असा सवाल ते कर्मचाऱ्यांना पडला आहे. आरोग्य विभाग व महाराष्ट्र पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हा या कोरोना महामारीत युनिफॉर्ममध्ये  कर्तव्य बाजवत असताना, आतून आक्रंदत असतो, तो नोकरी व कुटुंब या कचाट्यात पिळवटून  निघालेला आहे, त्यांचे मनोधैर्य, आत्मबल  वाढवण्यासाठी   शासन व प्रशासनाने  त्यांच्या कुटुंबीयांची  दखल घ्यावी. आणि आरोग्य  व पोलिस कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या मुलांना प्राधान्याने कोरोना लसीकरण करून घ्यावे अशी मागणी   राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गजानन रेवाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे  शासनाकडे केलेली आहे
Previous Post Next Post
MahaClickNews