अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी

अमरावती प्रतिनिधी, 
कोविड 19 विषाणूचा संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपातकालीन उपाययोजनेचा भाग म्हणुन मा.जिल्हाधिकारी यांनी 9 मे,2021 रोजी दुपारी 12 वाजता पासुन ते 15 मे,2021 राञी 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश पारीत केलेले आहेत. कोणत्याही व्यक्तिस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी राहील. सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पिठाची गिरणी इत्यादी दुकाने तसेच खाद्यपदार्थाची सर्व दुकाने, सर्व मद्यग्रुहे, मद्य दुकाने व बार ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील तथापि सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीत चालु ठेवण्यास परवानगी राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जावुन खरेदी करता येणार नाही. ग्राहकांनी दुकानदारांशी आँनलाईन पध्दतीने अथवा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुन साहित्यांची मागणी करावी. ई काँमर्स मार्फत अत्यावश्यक घरपोच सेवा सुरु राहतील तसेच स्थानिक दुकानदार हाँटेल यांच्यामार्फत घरपोच सेवा पूरविणारे कामगार यांच्याकडे ग्राहकाच्या घरी जातांना बिल व संबंधित दुकानदारा मार्फत देण्यात येणारे ओळखपञ सोबत बाळगणे अनिवार्य राहील. संबंधित कर्मचा-यांना निगेटिव्ह आर.टी.पी.सी.आर. चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील. 
दुकाने उघडण्‍याची परवानगी नसतांनाही शहरातील जे दुकाने उघडे होती त्‍यांना सिल लावण्‍याची कार्यवाही मा.आयुक्‍त प्रशांत रोडे यांच्‍या निर्देशावरुन करण्‍यात येत आहे. सहाय्यक आयुक्‍त नरेंद्र वानखडे यांच्‍या नेतृत्‍वात इतवारा बाजार, जवाहर गेट, जयस्‍तंभ चौक, राजकमल चौक, गांधी चौक, मालवीय चौक, बापट चौक मधील अनेक दुकाने सिल करण्‍यात आली आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्‍येक झोन अंतर्गत सहाय्यक आयुक्‍त यांच्‍या नेतृत्‍वात टिम बनविण्‍यात आली असून प्रत्‍येक झोननिहाय प्रतिबंधात्‍मक कार्यवाही करण्‍यात येत आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews