खरीप हंगामासाठी पिक कर्जाचे सुलभरित्या वितरण करावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. २४: कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी असल्याने शेतकऱ्यांना शेतीकाम करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची शेतात मशागतीच्या कामांची लगबग सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2021-22 करीता पिक कर्ज जिल्ह्यातील सर्व बँकांनी ज्यादा कागदपत्रांची मागणी न करता, सुलभरित्या उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश  जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.

            जिल्हाधिकाऱ्यांनी पिक कर्ज वाटपाबाबत आयोजित बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, लिड बँक मॅनेजर एल. के. झा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, व्यावसायिक व सहकारी बँकेचे व्यवस्थापक यावेळी उपस्थित होते.

            श्री. नवाल म्हणाले की, शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी सर्व बँकानी सहकार्य करावे. ज्यादा कागदपत्रांची मागणी करुन नाहक त्रास देऊ नये. शेतकऱ्यांकडून नो ड्यूज घेताना शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र ऐवजी स्वयंघोषणापत्र घ्यावे. शेतीचा सात-बारा, आठ-अ ही कागदपत्रे सीएससी सेंटर, सेतु सुविधा केंद्र किंवा आपले सेवा केंद्र, महाभूमी पोर्टल येथून काढलेले डिजीटल सहीचे मान्य करावे. पिक कर्जासाठी तलाठीव्दारे दिला जाणारा  7/12 वर सही, शिक्क्याची मागणी करु नये. ग्रामस्तरीय कोरोना समिती किंवा ग्रामस्तरीय कृती समित्यांनी शेतकऱ्यांचे पिक कर्जाचे अर्ज गोळा करुन बँकेचे व्यवसाय प्रतिनिधी किंवा बँक प्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून गरजूंच्या पिक कर्जांच्या प्रकरणांचा निपटारा करावा. बँक व्यवस्थापकांनी संबंधित गावामध्ये पिक कर्जाच्या प्रकरणांबाबत ग्रामस्तरीय कोरोना समिती किंवा ग्रामस्तरीय कृषी समिती यांच्याशी समन्वय साधून योग्य कार्यवाही करावी.

            पिक कर्ज नुतणीकरणासाठी शेतीचा 7/12 हा सीएससी सेंटर, सेतु सुविधा केंद्र किंवा आपले सेवा केंद्र, महाभूमी पोर्टल येथून काढलेले डिजीटल सहीचे मान्य करावे. शेतीचा आठ अ नमूना महाभूमी पोर्टल, ऑनलाईन पोर्टलवरुन काढलेला स्विकारण्यात यावा. यासंदर्भात संबंधित तलाठ्यांनी समन्वय साधून गावपातळीवर अडचणी सोडवाव्यात. नवीन पिक कर्जाकरीता आधार कार्ड, सात बारा उतारा, आठ  अ, फेरफार, दोन फोटो, जमिनीच्या नकाशा संदर्भात तलाठी यांनी दिलेला हात नकाशा किंवा जमिनीच्या हद्दी नमूद असलेला उतारा आदी कागदपत्रे पिक कर्जासाठी स्विकारण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितल
Previous Post Next Post
MahaClickNews