‘पोस्टा’तर्फे राज्यात अडीच हजार पदांची भरती अमरावती विभागात भरणार ग्रामीण डाकसेवकांची ८७ पदे

अमरावती, दि. ७ : भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमार्फत ग्रामीण डाकसेवकांची एकूण २ हजार ४२८ पदे भरण्यात येणार असून, त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

            या पदांपैकी ८७ पदे अमरावती विभागातील आहेत. या भरतीत शाखा पोस्टमास्टर, सहायक शाखा पोस्टमास्टर व डाकसेवकांची पदे भरली जाणार आहेत. स्थानिक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. इच्छूकांनी २६ मे २०२१ पूर्वी पोस्ट खात्याच्या  http://indiapost.gov.in किंवा http://appost.in/gdsonline या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन अमरावती विभागाच्या प्रवर डाकघर अधिक्षकांनी केले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews