तिवसा विधानसभा युवक काँग्रेस तर्फे जनसेवा दिवस व रुग्ण सेवा दिवस म्हणून अमरावती जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार यशोमतीताई ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार यशोमतीताई ठाकुर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोनाची महामारी लक्षात घेता तिवसा विधानसभा युवक काँग्रेस तर्फे सुपर स्पेशालिटी, जिल्हा सामान्य रुग्णालय, डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, दयासागर हॉस्पिटल अमरावती येथे कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना जेवणाचे वाटप करण्यात आले.
यावेळी तिवसा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रितेश पांडव, तिवसा विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष तथा सदस्य संजय गांधी निराधार समितीचे अंकुश राजाभाऊ जुनघरे, युवक काँग्रेस तिवसा विधानसभा महासचिव अक्षर ढोले, लुकेश केने, रोहित देशमुख, अक्षय निचित, सौरभ किरकटे, पवन काळमेघ, आदित्य भुयार, विकास इंगळे, पंकज मोरे, सागर देशमुख, सागर यादव, सागर कलाने, योगेश बुंदेले, अभिलेष देशमुख, जुनेद लकी, सागर जुनघरे, वैभव देशमुख, आशिष कांबळे आदी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते व परिश्रम घेतले.
Previous Post Next Post
MahaClickNews