आ. सुलभाताई खोडके यांची जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी चर्चा संभाव्य धोका टाळण्यासाठी ४०० ऑक्सीजन बेडची सुविधा निर्माण होणार

अमरावती १९  :  
 जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असतांना प्रभावी उपाययोजना व संभाव्य धोका टाळण्यासाठी आ. सुलभाताई खोडके यांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेशी सुसंवाद साधून प्रयत्नांची मालिकाच राबविली आहे. कोरोना महामारी काळात रुग्णांचे प्राण वाचविण्यालाच सर्वोतोपरी प्राधान्य देऊन ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू ओढवू नये म्हणून  जिल्हा कोविड रुग्णालयात प्रतिदिवस ४००  ऑक्सिजन बेडला पुरेल इतक्या क्षमतेचे  ऑक्सिजन जनरेशन प्लांट साकारण्यात यावा , याबाबत  आ. सौ सुलभाताई खोडके यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी चर्चा केली  . 
राज्यासह अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने दीर्घकालीन उपाययोजना करण्याला घेऊन आ. सुलभाताई खोडके यांनी गेल्या ३० एप्रिल २०२१  सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सभागृहात आरोग्य प्रशासनासोबत  बैठक  घेऊन कोरोना उपाययोजना तसेच समस्या व अडचणींबाबत आढावा घेतला होता  . याबैठकीत कोवीड विषयक  कामाकाजावर मंथन होत असतांना  रुग्णालयात  लिक्विड ऑक्सिजनचा थोडा तुडवडा भासत असून रुग्णसंख्या वाढल्यास ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्याला घेऊन अडचणी जाणवणार असल्याचे मत आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी व्यक्त केले होते .  यावर आ. सुलभाताई खोडके यांनी  जिल्हा कोवीड रुग्णालय व अन्य कोविड सेंटर येथे ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध व्हावा , यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारणी हेच लक्ष असून यासाठी सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी प्राधान्याने सोडविणार असल्याचे आ. सुलभाताई खोडके यांनी सांगितले होते .    दरम्यान नुकतीच १४ मे रोजी झालेल्या बैठकीतही  पुनःश्च  ऑक्सिजन च्या तुटवड्याचा मुद्दा समोर आला होता . ज्यामध्ये कोविड रुग्णालयामध्ये १२५ जम्बो सिलेंडर प्रतिदिवस उत्पादन क्षमतेचे पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांट प्रस्थापित करण्याचे आदेश निर्गमित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ . श्याम सुंदर निकम यांनी दिली .  परंतु  दररोज ३०० ते ४०० कोविड  रुग्ण दाखल होत येथे प्रतिदिवस ४०० क्षमतेचे ऑक्सिजनची आवश्यकता असल्याची निकड  बैठकीत  वर्तविण्यात आली.  कोरोना उपाययोजनांना घेऊन शासनाच्या धोरणाप्रमाणे जिल्ह्या स्तरावर ऑक्सिजन निर्मिती प्लांट असावा , म्हणून  अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयात देखील प्रतिदिवस ३०५  ऑक्सिजन बेडला पुरेल इतक्या क्षमतेचे  पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात यावा यासाठी  आ. सुलभाताई खोडके यांनी पुढाकार दर्शविला . तसेच या पथदर्शी प्रकल्पासाठी  जिल्हा शल्य चिकित्सांनी प्रस्ताव सादर करण्याची सूचना आमदार महोदयांनी यावेळी केली होती . यासंदर्भांतील सर्व प्रक्रिया व तांत्रिक बाबींची पूर्तता करून  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ शयाम सुंदर निकम यांनी तसा प्रस्ताव आमदार महोदयांना  सादर केला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने आ. सुलभाताई खोडके यांनी शासनाच्या धोरणानुसार  कोवीड -१९ आजाराच्या उपाययोजना कारण्यासाठी जिल्हा कोविड रुग्णालय अमरावती येथे पीएसए जनरेशन प्लांट उभारण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत यासंबंधीच्या महत्वपूर्ण बाबींवर चर्चा केली . 
  अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूमुळे कोविड -१९ आजारी रुग्णांचे प्रमाण वाढत आहे . कोविड रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण हे आयसीयूबेडवर   तसेच वार्डातील कृत्रिम प्राणवायू प्रणालीवर उपचार घेत आहे . मात्र वाढती रुग्णसंख्या व ऑक्सिजनचा अपुरा साठा  यामुळे आरोग्य यंत्रणेकडे अडचणी जाणवत आहे . तसेच या कारणाने रुग्णांच्या उपचारामध्ये व्यत्यय येऊन रुग्णसेवा कोलमडण्याची भीतीही   वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सदर बाब आ. सुलभाताई खोडके यांनी यांनी जिल्हाधिकारी महोदयांना अवगत करून दिली .  अमरावती जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन रिफिलिंगचे एकमेव उत्पादक  आहे . त्यांना ऑक्सिजनचे टॅंक हे मध्यप्रदेश स्थित भिलाई  तसेच अन्य महानगरातून मागवावे लागते . मात्र सद्या  सगळीकडेच कोरोनाने वेढा घातला असून त्यांनाही  ऑक्सिजनची तितकीच आवश्यकता आहे , अशा काळात मध्यप्रदेश सरकारने जर भिलाईतून अमरावतीला होणारी ऑक्सिजनची वाहतूक थांबविली किंवा लॉकडाउनच्या बंदीमुळे वाहतूक ठप्प झाली , तर अमरावतीत कोरोना रुग्णांना वेळेवर लिक्विड ऑक्सिजन न मिळाल्याने ते दगावण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याची बाब आ. सुलभाताई खोडके यांनी चर्चे दरम्यान स्पष्ट केली .
 कोविड रुग्णालय अमरावती येथे विषाणूच्या उद्रेकामुळे रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे . सद्या येथे दररोज ३०० ते ४०० कोविड रुग्ण भरती असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडरची आवश्यकता भासत  आहे .  कोविड महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविल्यामुळे सदर्हु रुग्णालयात जास्तीत जास्त ४०० लिक्विड ऑक्सिजनची उपलब्धता करणे ही बाब भविष्यासाठी  निकडीची ठरू पाहत असल्याने  शासनाचे धोरणानुसार जिल्हा कोविड रुग्णालयात प्रतिदिवस ३०५  ऑक्सिजन बेडला पुरेल इतक्या क्षमतेचे  पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांट  साकारण्यात यावा , अशी मागणी आ .सुलभाताई खोडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली.   यावर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुद्धा सकारात्मकता दर्शविली असून लवकरच याबाबत समिती स्थापन करून  कार्यवाही करणार असल्याचे सांगितले . आ. सुलभाताई खोडके यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कोरोना महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला घेऊन अमरावतीमध्ये पूर्वतयारी व नियोजन सुरु झाल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आलेख व मयतांचा आकडा कमी होऊन कोरोनावर नियंत्रण मिळविणार असल्याचे सुखद चित्र निर्माण झाले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews